For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

म्हैसाळमध्ये विजेच्या धक्क्याने बाप- लेकासह तिघांचा मृत्यू! एकमेकांना वाचविणाऱ्या जीवा-भावाच्या माणसांवर मृत्यूची झडप

01:08 PM Sep 30, 2024 IST | Abhijeet Khandekar
म्हैसाळमध्ये विजेच्या धक्क्याने बाप  लेकासह तिघांचा मृत्यू  एकमेकांना वाचविणाऱ्या जीवा भावाच्या माणसांवर मृत्यूची झडप
Sangli Maisal
Advertisement

पाळीव श्वानानेही तडफडून जीव सोडला; मुलगा व नातवाच्या मृत्यूमुळे आजोबांनाही हृदय विकाराचा झटका; महावितरणचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर, पालकमंत्र्यांनीही घेतली मृतांच्या कुटुंबियांची भेट, पाच लाखांची मदत जाहीर

मिरज-म्हैसाळ

प्रतिनिधी / वार्ताहर

तालुक्यातील म्हैसाळमध्ये रविवारी सकाळी पुन्हा एकदा मृत्यूने थैमान घातले. शेतात वैरण काढण्यासाठी गेल्यानंतर पाण्यात तुटून पडलेल्या उच्च दाबाच्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन बाप-लेक व चुलत भाऊ अशा तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुलाला वाचविणारे वडील आणि पुतण्या व भावाला वाचविण्यासाठी धडपडणाऱ्या काकावरही मृत्यूने झडप घातली. पाठराखण करणारे पाळीव श्वानही पाण्यात उडी माऊन तडफडून मृत झाले. तर आणखी एक मुलगा जखमी झाला. मुलगा व नातवाचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर आजोबांनाही हृदय विकाराचा झटका आला.

Advertisement

या घटनेमुळे म्हैसाळसह तालुक्यावर शोककळा पसरली आहे. महावितरणच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप होत आहे. पालकमंत्री सुरेश खाडे यांनी मृतांच्या नातेवाईकांची भेट घेऊन प्रत्येकी मृताला पाच लाख ऊपये मदत जाहीर केली. विजेचा धक्का बसून मयत झालेल्यांमध्ये पारिसनाथ माऊती वनमोरे (वय 40) त्यांचा मुलगा साईनाथ पारिसनाथ वनमोरे (वय 11) आणि पारिसनाथ यांचा चुलत भाऊ प्रदीप श्रीकृष्ण वनमोरे (वय 38) यांचा समावेश आहे.

तर बचाव कार्य करत असताना विजेचा धक्का बसून, पारिसनाथ यांचा मोठा मुलगा हेमंत वनमोरे (वय 13) हा गंभीर जखमी झाला. नातू आणि मुलाच्या मृत्यूची माहिती समल्यानंतर आजोबा माऊती वनमोरे यांनाही हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्यांनाही उपचारासाठी मिरज शासकीय ऊग्णालयात दाखल करण्यात आले.

Advertisement

घटनास्थळावऊन मिळालेली माहिती अशी, म्हैसाळ गावातील सुतारकी माळ येथे पारिसनाथ वनमोरे यांचे शेत आहे. रविवारी शेतातील नियमित कामासाठी व वैरण काढण्यासाठी पारिसनाथ हे आपली दोन मुले व चुलत भावासह शेतात गेले होते. मागील आठवड्यात दोनवेळा पडलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचून राहिले होते. याच पाण्यात उच्च दाबाची विद्युत तार पडली होती. पारिसनाथ व साईनाथ असे दोघे बाप-लेक वैरण काढत असताना त्यांना पाण्यात विद्युत प्रवाह असल्याची कल्पना नव्हती. साईनाथ याला आधी विजेचा धक्का बसला. सुऊवातीला काय झाले समजले नव्हते. मुलगा तडफडत असल्याचे दिसल्यानंतर पारसनाथ हे धावत गेले. मात्र विद्युत प्रवाहीत पाण्यात त्यांचाही पाय पडून त्यांनाही विजेचा जोरदार धक्का बसला.

तर साईनाथ व पारिसनाथ असे दोघे तडफडत असल्याचे दिसल्यानंतर पारिसनाथ यांचा चुलत भाऊ प्रदीप श्रीकृष्ण वनमोरे हे धावत आले. बचाव कार्य करताना त्यांनाही तारेचा स्पर्श होऊन विजेचा झटका बसला. पारिसनाथ यांचा मोठा मुलगा हेमंत हा देखील मदतीसाठी धावत आला. मात्र त्यालाही विजेचा धक्का बसला. मात्र, तो जखमी होऊन बाजूला उडून पडल्याने सुदैवाने बचावला.

तोपर्यंत पारिसनाथ वनमोरे, साईनाथ वनमोरे व प्रदीप वनमोरे अशा तिघांचा मृत्यू झाला होता. वनमोरे कुटुंबियांची पाठराखण करणाऱ्या पाळीव श्वानानेही धावत जावून पाण्यात उडी मारली. त्यामुळे श्वानाचाही तडफडून मृत्यू झाला. विजेचा झटका बसून बाप-लेकासह तिघांचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर सुतारकी माळ येथे ग्रामस्थांनी गर्दी केली.

महावितरण व ग्रामीण पोलिसांना माहिती देण्यात आली. ग्रामीणचे निरीक्षक भऊ तळेकर यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी जावून सर्व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय ऊग्णालयात पाठविले. जखमी हेमंत वनमोरे याला उपचारासाठी शासकीय ऊग्णालयात दाखल केले. घटनास्थळाचा पंचनामा कऊन गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुऊ होते.

विजेचा धक्का लागून बाप-लेक, चुलत भाऊ अशा तिघांसह पाळीव श्वानाचाही मृत्यू झाल्याने म्हैसाळसह तालुक्यावर शोककळा पसरली. जीवा-भावाची माणसं तडफडून मरण पावल्यामुळे ग्रामस्थ हळहळले. म्हैसाळ गावात दिवसभर दुखवटा पाळून नियोजित सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले. मयत पारिसनाथ वनमोरे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, वडील तर प्रदिप वनमोरे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, तीन, मुली असा परिवार आहे.

तीन बळी गेल्यानंतरही विद्युत प्रवाह सुरूच
दरम्यान शेतात विद्युत तारा तुटल्याबाबत महावितरण विभागाला कळवूनही दुरूस्ती केली नसल्यामुळे ही घटना घडल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला. घटना घडल्यानंतर बऱ्याच उशिरापर्यंत विद्युत प्रवाह सुरूच होता. त्यामुळे मृतदेह बाजूला घेण्यासाठीही मदत कार्य करणारे पुढे गेले नाहीत. शेतात तिघांचे मृतदेह बघत बसावे लागले. अखेर पोलीस अधिकारी घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दूरध्वनी कऊन तातडीने विद्युत प्रवाह बंद करण्यास सांगितले. महावितरणच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करून आधी तुटलेली तार बाजूला केली. त्यानंतर सर्व मृतदेह शेतातून बाहेर काढले.

आजोबांनाही हृदय विकाराचा झटका
स्वत:च्या शेतात मुलगा आणि नातवाला शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समजल्यानंतर मयत परिसनाथ यांचे वडील माऊती वनमोरे यांनाही हृदय विकाराचा झटका आला. त्यांनाही शासकीय ऊग्णालयात दाखल केले. सध्या मयत पारिसनाथ यांचा मोठा मुलगा हेमंत आfिण आजोबा माऊती वनमोरे अशा दोघांवर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे तज्ञांकडून सांगण्यात आले.

पाण्यात होत्या दोन वायरी
वनमोरे यांच्या शेतात साचलेल्या पाण्यामध्ये विद्युत प्रवाहीत दोन वायरी तुटून पडल्या होत्या, असा दावा मयत वनमोरेंचे नातेवाईक श्रीकृष्ण वनमोरे यांनी केला. शॉक लागून तिघांचा मृत्यू झाल्यानंतर महावितरणचे वायरमन घटनास्थळी आले. मात्र, यातील एक वायर त्यांनी हात चलाखीने बाजूला करून केवळ एकच वायर तुटल्याचे भासवले, असा आरोप नातेवाईकांनी केला. या प्रकरणात महावितरण कर्मचाऱ्यांची चौकशी कऊन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली. महावितरणचे अभियंता गलांडे व व्हटकर यांनीही घटनास्थळी भेट देऊन संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासह मृतांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई दिली जाईल, असे आश्वासन दिले.

मृतांना पाच लाखांची मदत
सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर पालकमंत्री सुरेश खाडे यांनीही वनमोरे कुटुंबियांची भेट घेऊन दु:ख व्यक्त केले. शासकीय ऊग्णालयात उपचारार्थी माऊती वनमोरे व हेमंत वनमोरे या दोघांचीही भेट घेऊन आधार दिला. घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. एकाच कुटुंबातील तीन माणसांवर दुर्दैवी मरण ओढवले. महावितरणच्या संबंधीत विभागांतर्गत अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी कऊन दोषींवर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या आहेत. वनमोरे कुटुंबाला आधार देण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी मृत व्यक्तीला पाच लाख ऊपये मदत देणार असल्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी यावेळी जाहीर केले.

Advertisement
Tags :

.