कौटुंबिक कारणातून वडील, मुलावर खुनी हल्ला
कोल्हापूर :
शिंगणापूर (ता. करवीर) येथील पुरग्रस्त कॉलनीमध्ये कौंटुबिक कारणातून मुलाने वयोवृध्द वडील आणि मुलावर तलवार हल्ला केला. सदाशिव रामचंद्र तोरस्कर (वय 78, रा. इंडिया ग्रुप मंडळाशेजारी, पुरग्रस्त कॉलनी, शिंगणापूर, ता. करवीर), मुलगा रितेश राजेंद्र तोरस्कर (वय 23, सध्या रा. 8 गल्ली, कुंभार गल्ली, शाहूपुरी, कोल्हापूर) अशी जखमींची नावे आहेत. हा हल्यात संशयित हल्लेखोर राजेंद्र सदाशिव तोरस्कर (वय 52, तिघे रा. इंडिया ग्रुप मंडळाशेजारी, पुरग्रस्त कॉलनी, शिंगणापूर, ता. करवीर) हा सुध्दा या हल्ल्यावेळी जखमी झाला. जखमींना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली आहे. करवीर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
जखमी तायकांदो प्रशिक्षक रितेश तोरस्कर यांचा वडील आणि संशयीत आरोपी राजेंद्र तोरस्कर या पितापुत्रामध्ये कौंटुबिक कारणातून गेल्या दिवसापासून मतभेद निर्माण झाले आहेत. असे असताना मंगळवारी रात्री रितेश यात्रेनिमित्याने कोल्हापूरहून गावाकडे आला. रात्री तो आजोबाच्या घरी झोपण्यासाठी आला. त्यांचा राग संशयित राजेंद्र तोरस्करला आला. पितापुत्रामध्ये शाब्दीक वादावादी सुऊ झाली. यावेळी सदाशिव तोरस्कर यांनी मुलगा राजेंद्र तोरस्करला भांडणाबाबत जाब विचारला. याचा संशयिताला राग आल्याने, त्याने घरात लपवून ठेवलेली तलवार आणली.
वयोवृध्द वडिलांना शिवीगाळ करीत त्यांच्या डोक्यात तलवार मारली. तलवारीचा वार वर्मी बसल्याने, त्यांचे वयोवृध्द वडील जमिनीवर रक्तबंबाळ होऊन कोसळले. यावेळी आजोबाच्या मदतीला धावलेला त्यांचा नातू तायकांदो प्रशिक्षक रितेश यालाही त्याने तलवारीच्या मागील मुठीने डोक्यात माऊन, त्यालाही जखमी केले. त्यानंतर त्यांच्या हाताला आणि छातीला चावून दुखापत केली. या तलवार हलल्यात संशयीत राजेंद्र तोरस्कर हा सुध्दा जखमी झाला.
या तिघा जखमींना उपचारासाठी तत्काळ सीपीआरमध्ये दाखल केले आहे. याप्रकरणी करवीर पोलिसात संशयित राजेंद्र तोरस्कर याच्या विरोधी गुन्हा दाखल झाला आहे. यांची फिर्याद त्यांचा मुलगा रितेश तोरस्कर यांनी दिली आहे.
- हल्ल्याची गावात एकच खळबळ
महाशिवरात्री निमित्याने शिंगणापूर येथे यात्रा भरली आहे. या यात्रेच्या काळात कौंटुबिक कारणावऊन तलवार हल्ला होऊन एकाच कुटुंबातील मुलगा, वडील, वयोवृध्द वडील, नातु आणि मुलगा जखमी झाले आहेत. या तिघा जखमीपैकी वयोवृध्द सदाशिव तोरस्कर यांची प्रकृती नाजूक बनली असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुऊ आहे. तर या हल्ल्यात संशयीत राजेंद्र तोरस्कर हा देखील जखमी असून, त्याच्यावर पोलीस बंदोबस्तात उपचार सुऊ आहे. तो बरा होताच त्याला अटक करण्यात येणार आहे, अशी माहिती करवीर पोलिसांनी दिली.