For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारताच्या हरितक्रांतीचे जनक एम. एस.स्वामीनाथन यांचे निधन

03:23 PM Sep 28, 2023 IST | अनुजा कुडतरकर
भारताच्या हरितक्रांतीचे जनक एम  एस स्वामीनाथन यांचे निधन
Advertisement

Ms swaminathan : भारतामध्ये हरित क्रांती घडवून आणणारे आणि हरित क्रांतीचे जनक असणाऱ्या एम. एस. स्वामीनाथन यांचे 98 व्या वर्षी निधन झाले आहे. भारतातील हरित क्रांती (Green Revolutio ) घडवून आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

Advertisement

त्यांच्या या कर्तृत्वाबद्दल भारत सरकारने त्यांना 1967 साली त्यांना पद्मश्री, 1972 मध्ये पद्मभूषण आणि 1989 पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्यांच्या कर्तृत्वाबद्दल त्यांचे भारताने गौरव तर केलाच होता. मात्र त्याचवेळी त्यांना जागतिक पातळीवरही त्यांच्या कामाची दखल घेतली होती.

स्वामीनाथन यांना 84 डॉक्टरेट

Advertisement

भारतात कृषी शास्त्रज्ञ आणि हरित क्रांतीचे जनक म्हणून त्यांची ओळख असलेल्या स्वामीनाथन यांना 84 डॉक्टरेट पदव्या बहाल करण्यात आल्या होत्या. त्यापैकी 24 आंतरराष्ट्रीय संस्थांनी त्यांना या पदव्या बहाल केल्या होत्या.

उत्पादन देणाऱ्या बियाणांची निर्मिती

कृषी शास्त्रज्ञ एम. एस. स्वामीनाथन यांना भारतातील हरित क्रांतीचे जनक’ म्हणूनच खऱ्या अर्थाने संबोधले जाते. 7 ऑगस्ट 1925 रोजी तामिळनाडूतील कुंभकोणममध्ये जन्मलेले एमएस स्वामीनाथन हे वनस्पती अनुवंशशास्त्रज्ञ म्हणून पहिल्यांदा जगासमोर आले होते. पंजाबच्या देशी वाणांमध्ये मेक्सिकन बियांचे मिश्रण करून त्यांनी 1966 मध्ये उच्च उत्पादक गव्हाचे संकरित बियाणे विकसित करण्यातही त्यांचा महत्वाचा वाटा आहे.

अन्नधान्यात स्वयंपूर्णता

‘हरितक्रांती’द्वारे जे देशात कार्यक्रम राबवण्यात आले. त्यामध्ये गरीब शेतकऱ्यांच्या शेतात उच्च उत्पन्न देणारे गहू आणि भाताचे बियाणे बियाणांची पेरणी करण्यात आली. त्यामुळे भारतात त्यांच्यामुळे अन्नधान्यात स्वयंपूर्णता प्राप्त झाली.

दुष्काळातून वाट काढली

बंगालमध्ये दुष्काळ पडल्यानंतर आणि देशातील अन्नटंचाईचा प्रश्न उद्भवल्यानंतर स्वामीनाथन यांनी 1943 मध्ये कृषी क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी प्राणीशास्त्र आणि कृषी या दोन्ही विषयांमध्ये पदवी प्राप्त केली.

उत्पन्न देणारे गहू

ज्यावेळी भारतात 1960 मध्ये दुष्काळाचे सावट पसरले होते, त्यावेळी स्वामीनाथन यांनी अमेरिकन शास्त्रज्ञ नॉर्मन बोरलॉग आणि सहकारी शास्त्रज्ञांबरोबर गव्हाचे जास्त उत्पन्न देणारे बियाणे त्यांनी विकसित केले.

Advertisement
Tags :

.