For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नागठाणे येथे बापाकडून मुलाची हत्या

12:14 PM Apr 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
नागठाणे येथे बापाकडून मुलाची हत्या
Advertisement

मुलगा आपल्यासारखा दिसत नसल्याच्या कारणाने हत्या केल्याचे स्पष्ट

Advertisement

विजापूर : नागठाणे, जिल्हा विजापूर येथील एका बापाने आपला मुलगा आपल्यासारखा दिसत नाही, असे गावातील काही लोकांकडून मिळत असलेल्या सततच्या टोमण्यामुळे मुलाची हत्या केली. सिद्धार्थ मल्लिकार्जुन अरकेरी (वय 6) असे दुर्देवी मृत मुलाचे नाव आहे. तर मल्लिकार्जुन अरकेरी असे निर्दयी बापाचे नाव आहे. घटनेविषयी जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी दिलेली अधिक माहिती अशी, सिद्धार्थ याला 16 मार्च रोजी शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी मल्लिकार्जुन घेऊन गेला होता. दरम्यान, त्याने सिद्धार्थ याला कराड जिह्यातील वडोलीजवळच्या कृष्णा नदीत ढकलून देत त्याची हत्या केली. त्यानंतर मल्लिकार्जुन याने सिद्धार्थ याला सिंदगी येथे शाळेत प्रवेश मिळवून दिला असून तेथील वसतिगृहात त्याला ठेवल्याचे कुटुंबीयांना सांगितले.

Advertisement
Advertisement
Tags :

.