For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अल्पवयीन मुलाकडून वडिलांचा खून

06:55 AM Aug 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
अल्पवयीन मुलाकडून वडिलांचा खून
Advertisement

गुरुवारी मध्यरात्रीनंतर उद्यमबागमधील घटना

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

बेळगाव

Advertisement

एका अल्पवयीन मुलाने फावड्याने मारून आपल्या वडिलांचा खून केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्रीनंतर उद्यमबाग परिसरात घडली आहे. उद्यमबाग पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

बाळाप्पा नागाप्पा तळवार (वय 45) राहणार उद्यमबाग असे खून झालेल्या वडिलाचे नाव आहे. गुरुवारी मध्यरात्रीनंतर झोपलेल्या आपल्या वडिलांवर फावड्याने मारहाण करून अल्पवयीन मुलाने त्यांचा खून केला आहे. पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळाप्पा नशेत येऊन पत्नी-मुलांबरोबर भांडण काढायचा. गुरुवारी रात्रीही भांडण झाले होते. मध्यरात्री हॉलमध्ये झोपलेल्या बाळाप्पाला अल्पवयीन मुलाने फावड्याने मारहाण केली. मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच उद्यमबागचे पोलीस निरीक्षक महांतेश होस्पेट व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

Advertisement
Tags :

.