For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Miraj News | बेडग गावातील 'त्या' रात्रीचा थरार! घरात घुसून बाप-लेकावर चाकूने सपासप वार; संपूर्ण मिरज हादरले!

12:59 PM Jun 04, 2026 IST | NEETA POTDAR
miraj news   बेडग गावातील  त्या  रात्रीचा थरार  घरात घुसून बाप लेकावर चाकूने सपासप वार  संपूर्ण मिरज हादरले
Advertisement

                          बेडगमध्ये घरजागेच्या वादातून बाप-लेकावर चाकू हल्ला

Advertisement

मिरज : तालुक्यातील बेडग येथे घर जागेच्या वादातून दोघा बाप-लेकावर चाकू हल्ला करण्यात आला. बापाला हातांबर तर मुलास छातीवर चाकूने बार करण्यात आले. या हल्ल्यात संतोष महादेव यमगर (वय ४०) व त्यांचा मुलगा व्यंकटेश यमगर असे दोघे जखमी झाले आहेत. याबाबत संतोष यांनी मिरज ग्रामीण पोलिसात तक्रार दिली

असून, संशयित आण्णासो हणमंत मोरे, सुभाष आण्णासोो मोरे आणि आणि आकाश आण्णासोो मोरे अशातिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.बेडग गावातील नागरगोजेवाडी येथे महादेव यमगर व संशयित तिघेजण राहण्यास आहेत. त्यांच्यात घर जागेवरुन वाद सुरू होता. यावेळी संशयित सुभाष मोरे याने संतोष यमगर यांच्या हातावर चाकूने बार केले. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या संतोष यांचा मुलगा व्यंकटेश याच्या छातीवर चाकूने मारुन जखमी केले. याबाबत मिरज ग्रामीण पोलिसात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.