For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Ashta Accident | मॉर्निंग वॉक ठरला काळ! आष्ट्यात अज्ञात वाहनाची दोघांना धडक; चालक गाडीसह गायब

11:39 AM May 14, 2026 IST | NEETA POTDAR
ashta accident    मॉर्निंग वॉक ठरला काळ  आष्ट्यात अज्ञात वाहनाची दोघांना धडक  चालक गाडीसह गायब
Advertisement

                          मॉर्निंग वॉक करणाऱ्या दोघांना अज्ञात वाहनाची धडक

Advertisement

आष्टा : आष्टा-बागणी मार्गावरथोटे डेअरीसमोर मंगळवारी पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने जाणाऱ्या एका अज्ञात चारचाकी वाहनाने रस्त्याच्या कडेने मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या दोन पादचाऱ्यांना मागून धडक दिली. यात दोघेही गंभीर जखमी झाले, धडक दिल्यानंतर वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार १२ मे रोजी सकाळी ५:३० च्या सुमारास सुरेंद्र रंगराव आटुगडे आणि जगन्नाथ धोंडीराम मस्के (दोन्ही रा. आष्टा) हे नेहमीप्रमाणे व्यायामासाठी बागणी ते आष्टा रोडने चालत निघाले होते. ते थोटे डेअरीसमोर आले असता, मागून येणाऱ्या अज्ञात चारचाकीच्याचालकाने वाहन निष्काळजीपणे चालवून या दोघांना धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दोघेही रस्त्यावर फेकले गेल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली.

Advertisement

मानवी जीवनास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने बाहन चालवून अपघातास कारणीभूत चालक, जखमींना मदत करण्याऐवजी वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी आनंदा सदाशिव आटुगडे (रा. आटुगडे मळा, आष्टा) यांनी आष्टा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आवटे करत आहेत. सीसीटीव्ही फुटेज तपासून अज्ञात वाहनाचा शोध घेत आहेत.

Advertisement
Tags :

.