Ichalkaranji Crime | इचलकरंजीत पूर्ववैमनस्यातून तरुणावर जीवघेणा हल्ला; ५ जणांवर गुन्हा दाखल
इचलकरंजीत पूर्ववैमनस्यातून तरुणावर जीवघेणा हल्ला
इचलकरंजी : पूर्ववैमनस्यातून तरुणावरजीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. प्रथमेश शंकर कोपार्डे, विवेक साळुंखे, सागर गायकवाड, रोहीत पुजारी आणि अल्तमेश (सर्व रा. पोबार मळा) अशी संशयितांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद जखमी अवधूत शंकर ढवळे (वय २६, रा. संग्राम चौक) यांनी दिली आहे.
शनिवारी रात्री सुमारे ८ बाजण्याच्या सुमारास पोबार मळा येथील जैन मंदिरासमोर ही घटना घडलीयाबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, यापूर्वी हनुमान जयंतीच्या दिवशी फिर्यादी अवधूतचे मित्र बेदांत लोखंडे व प्रणव मुळे यांचा संशयित प्रथमेश कोपार्डे याच्यासोबत वाद झाला होता. तो बाद मिटविण्यासाठी अवधूत ढवळे हे बेदांत लोखंडे, मोहसिन लोकापूरे व सकलेन मोमीन यांच्यासह पोवार मळा येथे गेले होते.
त्यावेळी संशयित आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून ढवळे यांना अडवले. तुला लय मस्ती आली आहे, तुला सोडत नाही, अशी धमकी देत प्रथमेश कोपार्डे याने इतर संशयित आरोपींच्या मदतीने ढवळे यांच्यावर
हल्ला चढविला. विवेक साळुंखे, सागर गायकवाड, रोहीत पुजारी व अल्तमेश यांनी ढवळे यांना पकडून ठेवले, तर प्रथमेश कोपार्डे याने लोखंडी एडक्याने त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूस, डाव्या हाताच्या पंजावर व कोपराबर वार करून गंभीर जखमी केले. तसेच इतर संशयित आरोपींनी लाथाबुक्यांनी मारहाण केली.जखमी अवस्थेत ढवळे यांना आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्याबर उपचार सुरू आहेत. या घटनेप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.