For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

धक्कादायक | 'तुझ्यामुळे अपंग मुलगा झाला' म्हणून टोकाचे पाऊल! फलटणमध्ये पती आणि सासूकडून सुनेला विष पाजण्याचा प्रयत्न

01:45 PM May 17, 2026 IST | NEETA POTDAR
धक्कादायक     तुझ्यामुळे अपंग मुलगा झाला  म्हणून टोकाचे पाऊल  फलटणमध्ये पती आणि सासूकडून सुनेला विष पाजण्याचा प्रयत्न
Advertisement

                        कुरवली खुर्दमध्ये गंभीर कौटुंबिक हिंसाचार

Advertisement

फलटण -फलटण तालुक्यातील कुरवली खुर्द येथील माळवाडी येथे पत्नीला मारहाण करून तोंडात विषारी तणनाशक औषध ओतून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पती व सासू यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रेश्मा प्रभाकर घनवट (वय ४१, रा. माळवाडी, कुरवली खुर्द, ता. फलटण, जि. सातारा) या आपल्या राहत्या घरी असताना पती प्रभाकरहनुमंत घनवट व सासू जनाबाई हनुमंत घनवट यांनी त्यांना 'तुझ्यामुळे आमच्या घराचे बाटोळे झाले, तुझ्यामुळे अपंग मुलगा झाला, तू सारखी बडबड करतेस' असे म्हणत शिवीगाळ केली. त्यानंतर दोन्ही हात मागे वळवून पिरगळत मारहाण करण्यात आली.

Advertisement

याचवेळी सासूने त्यांच्या तोंडात विषारी तणनाशक औषध ओतून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. सदर प्रकाराबाबत दाखल झालेल्या एमएलसीवरून गुन्हा नोंदविला आहे.

Advertisement
Tags :

.