For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मिरजजवळ रत्नागिरी-नागपूर महामार्गावर भीषण अपघात; जतचे ग्रामसेवक महेश म्हमाणे यांचा जागीच मृत्यू

12:59 PM May 23, 2026 IST | NEETA POTDAR
मिरजजवळ रत्नागिरी नागपूर महामार्गावर भीषण अपघात  जतचे ग्रामसेवक महेश म्हमाणे यांचा जागीच मृत्यू
Advertisement

                              कार–कंटेनर धडकेत जत ग्रामसेवक ठार

Advertisement

मिरज - मिरज तालुक्यातील कळंबी गावच्या - हद्दीत रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कंटेनर व कारच्या भीषण अपघातात जत तालुक्यातील न कोसारी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक महेश म्हमाणे यांचा जागीच मृत्यू  झाला. १२ चाकी कंटेनरला भरधाव न कारने पाठीमागून धडक दिल्याने हा न अपघात घडला.अपघाताचे सीसीटीव्ही चित्रण 1 प्राप्त झाले असून मिरज ग्रामीण 5 पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. रात्री उशिरापर्यंत घटनास्थळाचा पंचनामा
सुरू करून गुन्हा दाखल करण्याचे काम होते.

मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे सांगली येथील रहिवासी असले महेश म्हमाणे हे कोसारी ग्रामपंचायतीत ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते. शुक्रवारी दिवसभराचे काम आटोपल्यानंतर सायंकाळी ते सांगलीकडे परत होते. कळंबीच्या हद्दीत महामार्गावर आल्यानंतर भरधाव वेगात असलेल्या त्यांच्या चारचाकी वाहनावरील नियंत्रण सुटले. कार थेट रस्त्याच्याकडेला उभी असलेल्या १२ चाकी कंटेनरला पाठीमागून जोरदार धडकली. धडक इतकी जबरदस्त होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चुराडा झाला. या अपघात महेश म्हमाणे हे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.अपघाताची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.