For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kagal News | कागल सीमा तपासणी नाक्याजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागेवर मृत्यू

05:50 PM Feb 25, 2026 IST | NEETA POTDAR
kagal news   कागल सीमा तपासणी नाक्याजवळ भीषण अपघात  ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागेवर मृत्यू
Advertisement

                          राष्ट्रीय महामार्गावरच्या वळणावर अपघाताची वारंवार घडामोड

Advertisement

कागल -कागल सीमा तपासणी नाक्याजवळ पुन्हा एकदा भीषण अपघात घडला असून ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. शब्बीर हजरत देसाई (रा. हेर्ले) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सीमा तपासणी नाक्याजवळील धोकादायक वळणावर ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार ट्रकखाली सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी जमली होती. विशेष म्हणजे, गेल्या तीन दिवसांत याच ठिकाणी झालेला हा दुसरा अपघात असून दोन जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. वारंवार अपघात होत असूनही संबंधित प्रशासनाने ठोस उपाययोजना न केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.