For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पीओकेत भीषण दुर्घटना, किमान 20 ठार

06:32 AM May 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
पीओकेत भीषण दुर्घटना  किमान 20 ठार
Advertisement

गिलगिट बाल्टिस्तानात बस दरीत कोसळली

Advertisement

► वृत्तसंस्था/ मुजफ्फराबाद

पाकव्याप्त काश्मीरच्या गिलगिट बाल्टिस्तानात शुक्रवारी भीषण बस दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत कमीतकमी 20 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 21 जण जखमी झाले आहेत. काराकोरम महामार्गाच्या एका अरुंद भागात बस दरीत कोसळली आहे. या दुर्घटनेमुळे बसचा चेंदामेंदा झाला आहे. ही बस रावळपिंडी येथून गिलगिटच्या दिशेने जात होती आणि यातून 40 पेक्षा अधिक जण प्रवास करत होते.

Advertisement

दुर्घटनेची माहिती मिळताच बचावपथकांना घटनास्थळी रवाना करण्यात आले. जखमींना नजीकच्या चिलास रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. तर जखमींपैकी 5 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे डायमरचे उपायुक्त फैयाज अहमद यांनी सांगितले आहे.

बचावकार्याकरता सैन्याच्या हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली. ही दुर्घटना चिलास शहरापासून 20 किलोमीटर अंतरावर घडली आहे. भरधाव वेगामुळे ही दुर्घटना घडली असे अधिकाऱ्यांचे सांगणे आहे. परंतु गिलगिट बाल्टिस्तानातील खराब रस्त्यांमुळे अशाप्रकारच्या दुर्घटना घडत असतात असे स्थानिकांचे म्हणणे आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी लोकांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. तसेच जखमी लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना केली आहे. तसेच जखमींना सर्वप्रकारची वैद्यकीय मदत पुरविण्याचा निर्देश अधिकाऱ्यांना दिला आहे.

Advertisement
Tags :

.