For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur : कागलमध्ये भीषण अपघात ; दुधाच्या टँकरच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

01:10 PM Oct 28, 2025 IST | NEETA POTDAR
kolhapur   कागलमध्ये भीषण अपघात   दुधाच्या टँकरच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू
Advertisement

                 कागलजवळ दुधाच्या टँकरची दुचाकीला धडक  

Advertisement

कागल : दुधाच्या टँकरने समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात पिंपळगांव खुर्द येथील युबकाचा जागीच मृत्यू झाला. अजय प्रकाश वायदंडे (वय १९) असे मृताचे नाव आहे. कागल निढोरी राज्य मार्गावर कागल बहुवाडी येथे सोमवारी दुपारी साडेचार वाजता ही घटना घडली. टँकरचालक रस्त्यातील खड्डा चुकविण्याचा प्रयत्न करताना हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

अजय वायदंडे हा दुचाकीवरून कागलच्या दिशेने चालला होता. दुधाचा टँकर मुरगूड नाक्यावरून निढोरीच्या दिशेन जात होता. मुरगूड नाक्यापासून काही अंतरावर रस्त्यात मोठा खड्डा पडला आहे. हा खड्डा चुकविण्यासाठी चालकाने टँकर उजव्या बाजूला घेतला.

Advertisement

यावेळी समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला टँकरने जोरात धडक दिली. त्यामुळे अजय बायदंडे हा दुचाकीवरून रस्त्यावर कोसळला. गंभीर जखमी झालेल्या अमर वायदंडे याचा जागीच मृत्यू झाला. दुपारी साडेचार वाजता ही दुर्घटना घडली.

अपघाताची माहिती मिळताच कागल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पंचनामा करून वायदंडे याचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता कागल ग्रामीण रुग्णालयात पाठविला.यावेळी वायदंडे याच्या नातेवाईकांसह गावातील नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात मोठी गर्दी केली होती. रात्री ऊशिरा या घटनेची नोंद करण्याचे काम कागल पोलीस ठाण्यात सुरु होते.

रस्त्यातील खड्यामुळेच अपघात

कागल मुरगूड रोडवर येथील बडुवाडी जवळ रस्त्यात भला मोठा खड्डा पडला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून हा खड्डा आहे. हा खड्डा वळणावर असल्याने वाहनधारकांना याचा अंदाज येत नाही. त्यामुळे टैंकर चालकाने हा खड्डा चुकवण्यासाठी आपला टँकर रस्त्याच्या उजव्या बाजूला घेतला आणि समोरून येणाऱ्या दुचाकीला जोराची धडक दिली. यामध्ये या युवकाचा मृत्यू झाला. हा खड्डाच अपघाताला कारणीभूत ठरल्याचे चर्चा घटनास्थळी होती.

Advertisement
Tags :

.