महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हाथरसमध्ये भीषण अपघात

06:23 AM Sep 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मॅक्स-बसच्या धडकेत 12 जणांचा मृत्यू, 16 जखमी

Advertisement

वृत्तसंस्था/ हाथरस

Advertisement

उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये शुक्रवारी एक मोठी दुर्घटना घडली. शुक्रवारी संध्याकाळी रोडवेजच्या बसने मॅक्स लोडरला धडक दिली. या घटनेत 12 जणांचा मृत्यू झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. तसेच 16 जण जखमी झाले असून त्यांच्यावर नजिकच्या इस्पितळात उपचार सुरू आहेत. मॅक्स लोडरमध्ये प्रवास करणारे लोक आपल्या नातलगांच्या तेराव्याचे भोजन करून परतत होते.

आग्रा-अलिगड बायपासवर मीताई गावाजवळ अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारीही घटनास्थळासह जिल्हा रुग्णालयात पोहोचले. मिळालेल्या माहितीनुसार, मॅक्समध्ये जवळपास 35 लोक होते. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचण्याच्या सूचना दिल्या. तसेच मृतांच्या वारसांना त्यांनी आर्थिक मदतीची घोषणाही केली आहे. जिल्हाधिकारी आशिष कुमार आणि पोलीस अधीक्षक निपुण अग्रवाल घटनास्थळी पोहोचले होते. अधिकाऱ्यांनी अपघाताची माहिती घेतली. तसेच, गंभीर जखमींना उपचारासाठी अलीगढ येथे रेफर केले आहे. पोलीस प्रशासन मदत आणि बचावकार्यात गुंतले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article