For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara News : गोटेनजीक अपघातात चेसी चालकाचा मृत्यू

05:44 PM Jun 04, 2026 IST | NEETA POTDAR
satara news   गोटेनजीक अपघातात चेसी चालकाचा मृत्यू
Advertisement

कराड : पुणे-बंगळुरू आशियाई महामार्गावर कराडनजीक गोटे गावच्या हद्दीत झालेल्या अपघातात चेसी चालकाचा मृत्यू झाला. मुलचंद पंजाबी सिंग (रा. उत्तरप्रदेश) असे मृत चालकाचे नाव आहे. मंगळवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. याबाबत किशोर निंबा दशपुते (रा. डोणगाव ता. चांदवड, जि. नाशिक) यांनी शहर पोलिसांत खबर दिली आहे. 

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलचंद पंजाबी सिंग हा टाटा मोटर्स बेलुर इंडस्ट्रीयल धारवाड, कर्नाटक येथे चालक म्हणून काम करीत होता. मंगळवार २ रोजी सकाळी ७ वाजता मुलचंद हा धारवाड येथून नवीन चेसी घऊन फरिदाबाद, हरियाणा येथे चालला होता. दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास तो कराडनजीक गोटे गावच्या हद्दीत गोटे स्टॉपच्या मोरीजवळ सातारा बाजूकडे जात असताना त्याचे भरधाव चेसीवरील नियंत्रण सुटल्याने त्याने पुढे चाललेल्या अज्ञात वाहनास जोरदार धडक दिली. 

या भीषण अपघातात फरिदाबाद, हरियाणा येथे नवीन चेसी घेऊन जाताना अपघात चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव चेसीची पुढे निघालेल्या अज्ञात वाहनास धडक चेसी चालक मुलचंद सिंग हा गंभीर जख्मी झाला. त्याला तत्काळ रुग्णवाहिकेतून उपचारासाठी सह्याद्री हॉस्पिटल कराड येथे दाखल करण्यात आले, मात्र रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Advertisement

चेसीने पाठीमागून धडक दिलेले अज्ञात वाहन अद्याप सापडले नाही. त्यामुळे चेसीबरोबरच धडक दिलेल्या वाहनाचे किती नुकसान झाले अथवा त्या वाहनातील कोण जखमी झाले आहे का याबाबत माहिती मिळू शकली नाही. या अपघाताचा अधिक तपास कराड शहर पोलीस करीत आहेत.

Advertisement
Tags :

.