कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Kolhapur News : सादळे घाटात भीषण अपघात; निकमवाडीतील तरुणाचा मृत्यू

01:27 PM Dec 08, 2025 IST | NEETA POTDAR
Advertisement

                       सादळे घाटातील अपघाताने परिसरात हळहळ

Advertisement

सादळे : सादळे घाटात झालेल्या भीषण अपघातात निकमवाडी (ता. पन्हाळा) येथील तरुण मोटारसायकलस्वार नारायण सदाशिव खोत (वय ४०) यांचा जागीच मृत्यू झाला. मोटरसायकलला आयशर टेम्पोने समोरून दिलेल्या जबर धडकेमुळे हा अपघात झाला.

Advertisement

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, नारायण सदाशिव खोत हे पेठ वडगाव येथील मार्केटमध्ये हमालीचे काम करत होते. आज सकाळी ते कामासाठी गेले होते. दिवसभर काम करून सायंकाळी पाचच्या सुमारास ते कासारवाडीमार्गे निकमवाडी येथे परतत होते. सादळे घाटातील जुन्या जेनिसिस कॉलेजच्या पाठीमागील वळणावर पोहोचताच घोटवडेहून माल उतरुन सादळेमार्गे टोपच्या दिशेने येणाऱ्या आयशर टेम्पोने त्यांच्या मोटरसायकलला समोरून जोराची धडक दिली. या धडकेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर टेम्पो चालक वाहन घेऊन पसार होऊ लागला; मात्र पाठिमागून येणाऱ्या नागरिकांनी पाठलाग करून कासारवाडी येथे टेम्पो अडविला. दरम्यान, मृत नारायण खोत यांची बहिण कासारवाडी येथे असल्याने घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली
अपघाताची माहिती मिळताच शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याचे स.पो.नि. सुनील गायकवाड पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात पाठविला. .

Advertisement
Next Article