महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

समुद्रात उपोषणाचा निर्णय ठाम करत दामोदर तोडणकर यांचे उपोषण सुरू

10:53 AM Nov 07, 2023 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

मालवण बंदर जेटी समोर प्रशासनाविरोधात उपोषण

Advertisement

मालवण | प्रतिनिधी

Advertisement

मालवण बंदर जेटी समोरील समुद्रात मंगळवार 7 नोव्हेंबर रोजी सकाळपासून पर्यटन व्यावसायिक दामोदर तोडणकर यांनी उपोषणास सुरुवात केली आहे.दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन व मालवण तालुका प्रशासनास आपण यापूर्वीच निवेदन दिले आहे. त्यानुसार आपण समुद्रातील उपोषणाच्या निर्णयावर ठाम असल्याचे दामोदर तोडणकर यांनी सांगितले. प्रशासनाच्या विरोधात हे उपोषण असल्याचे तोडणकर यांनी माहिती देताना सांगितले.

दामोदर तोडणकर यांनी जिल्हा व तालुका प्रशासनास महसूल, बंदर व पोलीस विभागास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, मालवण बंदर जेटी येथे मी व माझे कुटुंबीय गेली अनेक वर्षांपासून राहत असलेले निवास स्वरूपातील बांधकाम अतिक्रमण असल्याचे सांगत प्रादेशिक बंदर अधिकारी महाराष्ट्र सागरी मंडळ, सिंधुदुर्गनगरी ,ओरोस यांच्या नोटीसी नंतर युद्धपातळीवर जमीनदोस्त करण्यात आले. याठिकाणी असलेली झाडेही जी आम्ही जपली ,वाढवली तीही जमीनदोस्त करण्यात आलीत.

मी व कुटुंब राहत असलेली बांधकाम शेड जमीनदोस्त करताना मालवण किनारपट्टीवरील अन्य 67 बांधकामधारक यांची यादी समोर आली होती. त्यांनाही अनधिकृत व अतिक्रमण बांधकाम तोडण्याबाबत 7 दिवस मुदतीच्या नोटीसा प्रशासनाने बजावण्यात आल्या होत्या. नोटीस कालावधी संपला त्यानुसार बांधकामाना तोडण्याबाबत बंदर विभाग अथवा प्रशासन यंत्रणा यांनी माझे बांधकाम जे न्यायालयीन लढाई स्वरूपातील होते ते जसे तोडले त्याच धर्तीवर तात्काळ धडक कारवाई इतर बांधकाम बाबत करणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे 7 नोव्हेंबर पासून मालवण बंदर जेटी समोरील समुद्रात बेमुदत उपोषण करत असल्याचे तोडणकर यांनी स्पष्ट केले.

नोटीसा बजावण्यात आलेली बांधकामे न पाडण्यात आल्याने तसेच बंदर जेटी समोरील झाडे जमीनदोस्त करण्याचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांवर अद्याप गुन्हा दाखल झाला नसल्याने या दोन प्रमुख मागण्या राहणार आहेत. तरीही नोटीसा बजावण्यात आलेली बांधकामे न तोडल्यास तसेच झाडे तोडण्याचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल न झाल्याने आपण समुद्रात उपोषण छेडत आहे. आंदोलनाची पुढील दिशा मालवण बंदर विभाग अथवा मालवण तहसिलदार कार्यालयासमोर कुटुंबा समवेत आत्मदहन करणार . या सर्वाला प्रशासनच जबाबदार असेल. असे दामोदर तोडणकर यांनी प्रशासनास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. सोबत न्यायालयीन स्तरावर आपला लढा सुरु असल्याचे दामोदर तोडणकर यांनी सांगितले.

Advertisement
Tags :
# malvan # Fasting against administration# malvan #
Next Article