For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अवैध वाळू, दगड उपशा विरोधात माडखोलात आमरण उपोषण सुरू

12:13 PM May 26, 2026 IST | अनुजा कुडतरकर
अवैध वाळू  दगड उपशा विरोधात माडखोलात आमरण उपोषण सुरू
Advertisement

अनुचित प्रकार घडल्यास महसूल प्रशासन जबाबदार : विशाल राऊळ

Advertisement

ओटवणे :  प्रतिनिधी
माडखोल - सांगेली भागात तेरेखोल नदीपात्रात गाळ उपसण्याच्या नावाखाली नदीपात्रातील वाळू - दगड - गोटे यांचे उत्खनन करून त्याचे मोठ्या प्रमाणात साठे करून सध्या गौण खनिजाची वाहतूक पासवर कोणीतीही नोंद नसताना अर्धवट पासच्या आधारे अवैधरीत्या परराज्यात वाहतूक होत आहे. याकडे ग्राम महसूल अधिकाऱ्यांचे अनेकवेळा लक्ष वेधूनही त्यांच्या बेजबाबदार व दुर्लक्ष कारभारामुळे हे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे या अवैधरित्या चाललेल्या प्रकाराची तातडणे पाहणी व चौकशी करून रितसर अहवाल सादर करण्यासाठी माडखोल येथील सामाजिक युवा कार्यकर्ते विशाल राऊळ यांनी ग्रामस्थांसह माडखोल तलाठी कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.सांगेली भागात नदीपात्र ठिकाण, दुपायू ठिकाण, श्रीकृष्ण गोशाळेच्या समोरील जमिनीमध्ये तसेच माडखोल - सांगेली सीमाभागात नार्वेकर नामक इसमाच्या जमिनीमध्ये तसेच वरकोंडवाडी येथे मुख्य रस्त्याच्या बाजूला अवैधरीत्या वाळू, दगड गोटे यांचा उपसा करून ठेवण्यात आला आहे. तसेच बांदुली येथे क्रशर घालून गौणखनिजाची वाहतूक होत आहे. याबाबत महसूल प्रशासनाचे अनेक वेळा उपोषण व आंदोलन याद्वारे लक्ष वेधले मात्र आश्वासनापलीकडे कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळेच या अवैध प्रकाराची तातडीने पाहणी व चौकशी करून येथील रितसर अहवाल सादर करावा. यासाठी विशाल राऊळ ग्रामस्थांसह माडखोल तलाठी कार्यालयाकडे आमरण उपोषणाला बसले आहेत. तसेच प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे ग्रामस्थांनी अवैद्य वाहतूक रोखून काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास सर्वस्वी महसूल प्रशासन जबाबदार राहणार असल्याचा इशारा विशाल राऊळ यांनी दिला आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.