जी.बी.लिंगदळी अॅथलेटिकमध्ये जलद धावपटूंची बाजी
आयुर, श्रीशथा, गौतम, चैतन्य, मोहम्मद, ताहीर, भुवन, धनश्री, त्रिशा, सिद्धी, श्रावणी, श्रीजल, स्वरा, अपूर्वा विजयी
बेळगाव : बेळगाव जिल्हा अॅथलेटिक संघटना व जी.बी. लिंगदळी ट्रस्ट आयोजित जी. बी. एल. डायनामिक रनर्स आणि निजाम स्पर्धेसाठी निवड चाचणी स्पर्धेमध्ये आयुर चौगुले, श्रीशथा जितेंद्र, गौतम गौडा, चैतन्य जुवेकर, मोहम्मद दाडी, ताहीर हुसेन, भुवन पुजारी, धनश्री काकतीकर, त्रिशा तारबार, सिद्धी बुद्रुक, श्रावणी मारुती, श्रीजल जाधव, स्वरा शिंदे, अपूर्वा नाईक यांनी जलद धावपटूंचा बहुमान मिळविला. जिल्हा क्रीडांगणावर आयोजित करण्यात आलेल्या जी.बी.एल. ट्रस्ट आयोजित या अॅथलेटिक स्पर्धेत जवळपास 650 हून अधिक खेळाडूंनी भाग घेतला होता. स्पर्धेचे उद्घाटन पुरस्कर्ते व ज्येष्ठ धावपटू संजय लिंगदळी, निर्मला लिंगदळी, ए. बी. शिंत्रे, मधुकर देसाई आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
निकाल पुढील प्रमाणे....
100 मी. मुलींचा विभाग धावणे 8 वर्षांखालील गट 1) धनश्री काकतीकर-बालिका, 2) श्रीनिधी हंचिमनी-सेंट जॉन-काकती, 3) श्रावी किल्लेकर-डी.पी., 10 वर्षाखालील गट 1)त्रिशा तारबार-जैन, 2)पुष्पा हंपन्नावर-के.व्ही.-2, 3)दृष्टी पाटील-अंगडी, 12 वर्षाखालील गट 1)सिद्धी बुद्रुक-केएलएस, 2)स्नेहल नाईक-ज्योती, 3) अराध्या नाइक-चिकोडी, 14 वर्षांखालील गट 1)श्रावणी मारुती-आर्मी, 2)साक्षी खांडेकर-बालिका, 3)श्रावणी शेलार-बालिका, 16 वर्षांखालील गट 1)श्रेजल जाधव-बलिका, 2)सृष्टी निलजकर-ज्योती, 3)समृध्दी सोनार-गोमटेश, 18 वर्षांखालील गटात 1)स्वरा शिंदे-गोगटे, 2)स्नेहल हुडेद-लिंगराज, 3) प्रायोजा गुरव-महिला, 20 वर्षांखालील व खुला गटात 1)अपूर्वा नाईक, 2) वैभवी बुद्रुक, 3)स्मिता काकतीकर-सर्व लिंगारज
100 मी. मुलांचा विभाग धावणे 8 वर्षांखालील गट 1) आयुर चौगुले-सेंट पॉल्स, 2) विवांश पाटील-अंगडी, 3) जी. सुचित चव्हाण-डिव्हाईन मर्शी, 10 वर्षाखालील गट 1)श्रीशित जितेंद्र-केएलएस, 2)जयदेव पाटील-ज्योती, 3)शौर्य रेडेकर-हेरवाडकर, 12 वर्षांखालील गट 1) गौतम गौडा-ग्रीन बेल, 2) श्रेयश निलजकर-ज्योती, 3) सुशिलकुमार पाटील-ज्योती, 14 वर्षांखालील गट 1) चैतन्य जुवेकर-सेंट पॉल्स, 2) श्रेयश कडोलकर-कंग्राळी, 3) समर्थ पाटील-ज्योती, 16 वर्षांखालील गट 1)मोहम्मद दाद्दी, 2)यशवंत कोटांक-जीएसएस, 3) जय अंटो-सेंट पॉल्स, 18 वर्षाखालील गट 1) ताहीर हुसेन-एस.एस.स्वामीजी, 2) स्वयंम जुवेकर, 3) गौतम अष्टेकर-दोघेही भरतेश, 20 वर्षांखालील गट 1) भुवन पुजारी-भरतेश, 2) रोहीत माईलगोळ-एसजीएम, 3) विशाल मंतुर्गी-जैन, खुला गट 1) भुवन पुजारी-भरतेश, 2) झाखीरखान सारवार-भरतेश, 3) चैतन्य मुदलियर-भरतेश
ट्रायथलॉन मुलांचा गट अ- 1) वेदांत गुरव-होलीक्रॉस, 2) बसनगौडा खानगौडर-जीए, 3) गुलशन- डी.टी.देसाई, ब गट- 1)समक्ष कुंभार- एमबीएस, 2) विनायक पाटील-मच्छे, 3) हरिश कुगजी-ज्योती, क गट- 1) अनुज हणगोजी-केएलएस, 2) चैतन्य जुवेकर-सेंट पॉल्स, 3) सक्षम कुंभार-एमबीएस, भालाफेक लहान गट- 1) श्रेयश काकतीकर-मच्छे, 2) तुकाराम लमाणी-एसएस, बसनगौडा खानगौडर-जीए.
ट्रायथलॉन मुलींचा गट अ- 1) माधुरी पाटील-कंग्राळी, 2)सेजल धामणेकर-बालिका, 3) श्रावणी धामणेकर-आर्मी, ब गट- 1) भावना बर्डे-संत मीरा, 2) पूर्वी अणवेकर-अमृता, 3) माहीरा पिल्ले-बीपी, क गट- 1) श्रावणी शेलार-बलिका, 2) किंजल सावंत-ज्योती, 3) मान्यता गवंडी-यमकनमर्डी, लहान मुलींसाठी भालाफेक 1) आरती मुरकुटी-जीजी, 2) निधी नागोजीचे- सेंट झेवियर्स, 3) स्वरोजा हाजगोळकर- क्रीडाशाळा,
60 मी. धावणे मुले 1) जय अंटो-सेंट पॉल्स, 2) स्वयंम पाटील-ज्योती, 3) रोहीत आर. एम.-एसजीएम, 80 मी. अडथळा 1) समर्थ कदम-ठळकवाडी, 2) अथर्व नाईक-अमृता, 3) वेदांत पाटील-प्रेशियस ब्लॉसम, 600 मी. धावणे 1) समर्थ तेली-सिद्धरामेश्वर, 2) प्रितम कुरबर-सेवंत डे, 3) हरिष घोरी-ज्योती, गोळाफेक- 1) प्रसन्ना पुंडलिक-हारुगेरी, 2) मनोज बाहुबली-हारुगेरी, 3) प्रतिक नरशीगौडा-मजगाव, भालाफेक-1)प्रसन्न पुंडलिक-हारुगेरी, 2) मनोज बाहुबली-हारुगेरी, 3) मंथन धोपे-आंबेवाडी, लांबउडी-1) संकेत आरेर, 2)स्वयंम पाटील, 3) ऋतुराज पाटील-दोघेही ज्योती, उंचउडी- 1) संदीप कांबळे-मच्छे, 2) प्रितम कुरबर-सेवंत डे, 3) साईराज गोल्याळकर-ज्योती,
60 मी. धावणे मुली-1) श्रुती निलजकर-ज्योती, 2) साक्षी खांडेकर-बालिका, 3)गौरी पुजारी-जीए, 80 मी. अडथळा-1) साक्षी खांडेकर-बालिका, 2) ऋतुजा सुतार-बालिका, 3) राणी हलब-ज्योती, 600 मी. धावणे-1) गौरी पुजारी-जीए, 2) सर्वज्ञा आंबोजी-जीवनज्योती, 3) प्रज्ञा मोहीते-बालिका, गोळाफेक-1) शालिनी टुमरी-इमामगोळ, 2) निकीता बरगळी-एसए, 3)ऋतुज साळवी-मंडोळी, भालाफेक-1) शालिनी टुमरी, 2) साक्षी नार्वेकर-जीए, 3) ऋतुजा साळवी-मंडोळी, लांबउडी-1) सौम्या निर्मल-यमकनमर्डी, 2)सुचिता कांबळे, 3) ममता फगरे-दोघीही मंडोळी, उंचउडी-1) ऋतुजा सुतार, 2) प्रज्ञा मोहीते-दोघीही बालिका, 3) मनस्वी चव्हाण-संतमीरा यांनी विजेतेपद पटकाविले. सायंकाळी झालेल्या बक्षीस वितरण कार्यक्रमात निर्मला लिंगदळी, संजय लिंगदळी, राघवेंद्र कागवाड, डॉ. गिरीश सोनवालकर, डॉ. रामकृष्ण एन., डॉ. जगदीश गस्ती, जी. एन. पाटील, संजीवकुमार नाईक, यष्टी पाटील, राजेश कांबळे, किरण पिंगारी, गौरीशंकर गौडर यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना आकर्षक चषक, प्रमाणपत्र व रोख रक्कम देवून गौरविण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शंकर कोलकार, हर्षवर्धन सिंगाडे, सुरज रेवणकर, उमेश मजूकर, सी. आर. पाटील, बेळगावातील क्रीडाशिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.