तेजीला विराम, सेन्सेक्स 150 अंकांनी प्रभावीत
जागतिक पातळीवरील नकारात्मक संकेताचा परिणाम
वृत्तसंस्था /मुंबई
भारतीय भांडवली बाजारातील चार दिवसांचा तेजीचा प्रवास अखेर बुधवारच्या सत्रात थांबला. यामध्ये जागतिक पातळीवरील नकारात्मक वातावरणामुळे नफावसुली झाल्याने तेजीला विराम मिळाला आहे. दिवसभरातील कामगिरीनंतर सेन्सेक्सचा निर्देशांक 150 अंकांपेक्षा अधिक अंकांनी घसरला आहे. दुसऱया बाजूला विदेशी भांडवलदारांनी नफा कमाई केल्याने रुपया प्रभावीत होण्याचा प्रवास सुरुच आहे. यामुळे देशातील बाजार नुकसानीत राहिल्याचे दिसून आले.
बुधवारी चढउताराच्या प्रवासात सेन्सेक्स 150.48 अंकांनी घसरुन निर्देशांक 53,026.97 वर बंद झाला आहे. काही वेळ सेन्सेक्स 564.77 अंकांनी प्रभावीत झाला होता. दुसऱया बाजूला 51.10 अंकांनी घसरुन निर्देशांक 15,799.10 वर बंद झाला.
मागील चार सत्रांच्या कामगिरीमध्ये तेजी कायम राहिली होती. ती थांबली असून चार सत्रात जवळपास 1,354 अंक व निफ्टी 436 अंकांनी मजबूत राहिली होती. मुख्य कंपन्यांमध्ये 20 समभागांत घसरण राहिली असून यामध्ये इंडसइंड बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, ऍक्सिस बँक, बजाज फिनसर्व्ह, विप्रो, एचसीएल टेक, टायटन, कोटक महिंद्रा आणि बजाज फायनान्स यांचे समभाग सर्वांधिक नुकसानीत राहिले होते.
अन्य कंपन्यांमध्ये एनटीपीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, सनफार्मा, अल्ट्राटेक, सिमेंट आणि आयटीसी यांचे समभाग तेजीत राहिले होते. यामुळे सेन्सेक्सला काही प्रमाणात समर्थन मिळाले होते. एनटीपीसी सर्वाधिक 2.46 टक्क्यांनी तेजीत राहिले होते, तर रिलायन्स इंडस्ट्रीज 1.98 टक्क्यांनी मजबूत झाले होते.
जागतिक पातळीवर नकारात्मक संकेत राहिल्याने देशातील बाजार नुकसानीत राहिला होता. तर प्रमुख कंपन्यांच्या समभागात खरेदी झाल्याने काहीसे प्रभावीत झाले आहेत. वाढती चलन वाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी व सततच्या वाढत्या चलन वाढीच्या दराने ग्राहकांचा वेगाने विश्वास कमी होत असल्याने मुख्य कंपन्यांचे समभाग प्रभावीत होत बंद झाले आहेत.
बीएसईमध्ये मिडकॅप 0.70 टक्क्यांनी घसरला आहे, तर स्मॉलकॅप 0.18 टक्कयांनी नुकसानीत राहिला आहे. आशियातील अन्य कंपन्यामधील जपानचे निक्की, चीनचा शांघाय कम्पोजिट, दक्षिण कोरियाचा कॉस्पी व हाँगकाँगचा हँगसेंग घसरणीत राहिले. याच दरम्यान आंतरराष्ट्रीय तेल मानक बेंट क्रूड 0.31 टक्क्यांनी वधारुन 118.3 डॉलर प्रति बॅरेलवर राहिला आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयात सलगची घसरण राहिल्याने बुधवारी प्रथमच 79 प्रति डॉलवर रुपया राहिल्याची नोंद केली आहे.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- एटीपीसी........... 141
- रिलायन्स इंडस्ट्रीज 2579
- सनफार्मा........... 840
- अल्ट्राटेक सिमेंट. 5623
- आयटीसी........... 274
- पॉवरग्रिडकॉर्प..... 211
- भारती एअरटेल... 684
- नेस्ले.............. 17490
- मारुती सुझुकी... 8507
- एसीसी............ 2155
- कोल इंडिया........ 188
- एचपीसीएल....... 223
- आयशर मोर्ट्स... 2879
- हिंडाल्को............ 344
- सिप्ला............... 945
- सिमेन्स............ 2380
- एसबीआय कार्ड... 775
समभाग घसरलेल्या कंपन्या
- हिंदुस्थान युनि.. 2238
- ऍक्सिस बँक........ 625
- बजाज फिनसर्व्ह 11114
- विप्रो................. 420
- टायटन............ 1936
- कोटक महिंद्रा.... 1642
- एचसीएल टेक..... 988
- इंडसइंड बँक....... 807
- बजाज फायनान्स 5510
- इन्फोसिस........ 1463
- एशियन पेन्ट्स.. 2698
- स्टेट बँक............. 459
- आयसीआयसीआय 702
- टीसीएस.......... 3291
- डॉ.रेड्डीज लॅब... 4363
- लार्सन ऍण्ड टुब्रो 1547
- एचडीएफसी .... 2176
- एचडीएफसी बँक 1343
- महिंद्रा ऍण्ड महिंद्रा 1111
- टेक महिंद्रा....... 1021
- गोदरेज.............. 766
- अपोलो हॉस्पिटल 3715
- बंधन बँक........... 268
- मॅरिको 476