For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फॅशन मॉडेलचा बनला ‘पुतळा’

06:32 AM May 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
फॅशन मॉडेलचा बनला ‘पुतळा’
Advertisement

जर्मनी या देशाची सुपरमॉडेल मानली जाणारी हॅडी क्लम सध्या बरीच चर्चेत आहे. तिने या देशातील एका कार्यक्रमात भाग घेताना स्वत:ची वेषभूषा एखाद्या ग्रीक देवतेसारखी बनविली. तिच्याकडे पाहिल्यानंतर ती संगमरवरी पुतळ्याप्रमाणे भासत होती. तिच्या ही वेषभूषा संगमरवरी पुतळ्याच्या इतकी समान होती, की पाहणाऱ्या अनेक जणांना हा तिचा पुतळाच बनविण्यात आला आहे आणि तो या कार्यक्रमात प्रदर्शनासाठी ठेवण्यात आला आहे, असेच वाटत राहिले. हा कार्यक्रम या देशात प्रत्येक वर्षी साजरा करण्यात येतो. यावर्षी कार्यक्रमाची थीम “फॅशन इज आर्ट’ हा होता. त्या अनुरुप अशी वेषभूषा या सुपरमॉडेलने केली होती.

Advertisement

तिच्या या वेषभूषेची रचना सुप्रसिद्ध रचनाकार माईक मरीनो यांनी केली होती. ‘वील्ड वेस्ट’ नामक एका प्रसिद्ध पुतळ्यापासून प्रेरणा घेऊन त्यांनी या मॉडेलसाठी ही वेषभूषा बनविली असल्याची माहिती त्यांनी स्वत: दिली. ही वेषभूषा इतकी उत्कृष्ट साधली होती, की या कार्यक्रमाला उपस्थित लोकांना तो खरोखरचा पुतळा वाटला आणि अनेकांनी या पुतळ्यासंबंधी माहिती घेण्याचाही प्रयत्न केला. काहींनी हा पुतळा अमेरिकेच्या स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्यासारखा असल्याची टिप्पणी केली.

विशेष बाब अशी की, या मेडलला ही वेषभूषा करण्यासाठी केवळ 20 मिनिटांचा कालावधी लागला. माणसांनी तासन्तास पुतळ्यासारखे निश्चल उभे राहण्याचे प्रकार अलिकडे अनेक कार्यक्रमांमधून केले जातात. कार्यक्रमाचे आकर्षण वाढविण्याचा तो एक उपाय असतो. तथापि, ती प्रक्रिया भिन्न प्रकारे केली जाते. या कार्यक्रमात मात्र, केवळ वेषभूषेच्या वैशिष्ट्यापूर्ण रचनेमुळे हा परिणाम साधला गेला होता. सध्या ही घटनाही सोशल मिडियावरुन प्रसिद्ध होत असून अनेकांनी या वेषभूषेच्या रचनेसंबंधी आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच, या कृतीमुळे फॅशन डिझायनर आणि मॉडेल अशा दोघांच्याही प्रसिद्धीत वाढ होईल असे दिसून येते.

Advertisement

Advertisement

.