For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मंदिरांमध्ये फॅशनला मनाई, जानेवारीपासून ‘ड्रेस कोड’

12:39 PM Dec 25, 2023 IST | Tarun Bharat Portal
मंदिरांमध्ये फॅशनला मनाई  जानेवारीपासून ‘ड्रेस कोड’
Advertisement

फोंडा तालुक्यातील बहुतांश देवस्थानांचा निर्णय

Advertisement

पणजी : मंदिरांचे पावित्र्य जपावे तसेच बिभत्सीकरणाचे दर्शन इतर भक्तांना होऊ नये, यासाठी मंदिरांमध्ये कपड्यांच्या विविध फॅशनसाठी मज्जाव करण्यात येणार आहे. नवीन वर्षांपासून फोंडा तालुक्यातील देवस्थानांनी 1 जानेवारी 2024 पासून देवस्थानात येणाऱ्यांसाठी ड्रेस कोड कठोरपणे लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मंदिराच्या परिसरात किंवा मंदिरात शॉर्ट्स, मिनीस्कर्ट, मिडी, स्लीव्हलेस टॉप, लो-राईज जीन्स, स्कीनटाईट जीन्स आणि शॉर्ट टीशर्ट घालून येणाऱ्यांना आता देवस्थानात प्रवेश करण्यापासून रोखले जाणार आहे. योग्य पोशाख न केलेल्यांना रोखण्यात येईल. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी पर्यटक त्यांच्या कपड्यांवर उपर्णे आणि लुंगी घालू शकतात. फोंडा येथील श्रीरामनाथ देवस्थानचे अध्यक्ष वल्लभ कुंकळ्ळीकर यांनी सांगितले की, मंदिरामध्ये 1 जानेवारीपासून कडकपणे ड्रेस कोड लागू केला जाणार आहे. मंदिराच्या आवारातील नोटिस बोर्डवर ड्रेस कोड अॅडव्हायझरी आधीच लावलेली आहे, असेही त्यांनी सांगितले.

मंदिरांचे पावित्र्य राखणे महत्त्वाचे

Advertisement

गोवा राज्य समुद्र किनाऱ्यांमुळे पर्यटकांना भुरळ घालत असले तरी या ठिकाणच्या धार्मिक पर्यटनालाही भेट देण्यासाठी अनेक भाविक व पर्यटक गोव्यात येतात. त्यामुळे मंदिरात येताना भाविकांनी पोशाख परिधान करताना कोणत्याही प्रकारे शरीराचे प्रदर्शन होऊ नये, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. मंदिरात येताना भाविक प्रसन्न मनाने व भक्तिभावाने देव-देवतांचे दर्शन घेण्यासाठी येतात. मात्र काहीजण विभत्स कपडे परिधान करतात. त्यामुळे पावित्र्य बिघडते, यासाठी ड्रेस कोडची सक्ती अनिवार्य असल्याचे मंदिरातील पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Advertisement
Tags :

.