Agri News : नाद खुळा! चक्क म्हशींच्या औताने शेतमशागत, शेतकऱ्याची नामी शक्कल!
बळीराजा शेतांच्या मशागतीसह पेरणी वेळेत करण्यासाठी धडपडत आहे.
महागाव : मे महिन्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. ऐन पेरणीपूर्व तयारीत असलेल्या शिवाराची दाणादाण उडाली. पण जूनमध्ये पावसाने उघडीप दिली असली तरी अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे बळीराजा शेतांच्या मशागतीसह पेरणी वेळेत करण्यासाठी धडपडत आहे.
पेरणीसाठी पूर्वी शेतकऱ्यांना बैलजोडी हा एकमेव आधार होता. त्यानंतर त्याची जागा ट्रॅक्टरसारख्या यंत्रांनी घेतली. पण सध्या अनेक कारणामुळे बैलजोडी सांभाळण्याकडे शेतकऱ्यांना कठीण झाले आहे. ट्रॅक्टर परवडत नाही. त्यामुळे महागाव व परिसरातील काही शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागतीसाठी दुभते जनावर म्हशीचा दुहेरी उद्देश ठेवून बहुतांश शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून यांत्रिक ट्रॅक्टरद्वारे झटपट मशागत करू लागले आहेत. ज्यांच्याकडे बैलजोड्या आहेत, बैल सांभाळण्याची आवड आहे.
काही शर्यत शौकीन आहेत ते बैलांच्या साहाय्याने शेतीची मशागत करत आहे. पण सध्या बैलजोडी सांभाळणे कठीण होऊन बसले आहे. कारण बैलांना खुराक, चारा, निवारा आणि त्यांच्या दिवसेंदिवस वाढत असलेल्या किमती, शिवाय शेतीकामे झाल्यानंतर त्यांना सांभाळावे लागते.
अल्पभूधारक शेतकऱ्यांना ट्रॅक्टर विकत घेणे परवडत नाही व ते चालवण्याचे तंत्र अवगत नसते, असे शेतकरी सध्या पावसाने उघडीप दिल्याने वेळेत पेरण्या व्हाव्या यासाठी वाटेल ते पैसे मोजून शेतकरी भात पिकांच्या पेरण्या करण्यासाठी धडपडत आहेत. पण काही शेतकऱ्यांनी वेळेत पेरणी करण्यासाठी घरातील दुभत्या म्हशींचा वापर दुधाबरोबर शेतीतील पेरणीसाठी होतोय म्हशींचा वापर बैलजोडीची कमतरता पेरणीसाठी करत आहेत.
शेतकरी शेतीबरोबर जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायासाठी म्हशी पाळतात. त्यातून कुटुंबाला हातभार म्हणून चार पैसे मिळतात. म्हशीचा सांभाळ घरातील पुरुषाप्रमाणे महिला व लहान मुले देखील करू शकतात. त्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांनी घरातील म्हशींचा वापर दुधाबरोबर शेतीसाठीही करत असल्याचे चित्र महागाव परिसरात आहे.