शेतकरी संघाचे पेट्रोल पंप चालणार सौर ऊर्जेवर
कोल्हापूर / दीपक जाधव :
शेतकरी सहकारी संघांच्या पाच पेट्रोल पंपावर सोलर पॅनल बसवून पेट्रोल पंपासाठी लागणारी वीज निर्मिती करण्यात येणार आहे. यातुन महिन्याकाठी 77 हजारांची बचत होणार असून संचालक मंडळाच्या 22 तारखेला होणाऱ्या बोर्ड मिटींग मध्ये यावर अंतिम निर्णय होणार आहे.
संघाचे जिल्हात सात तर मुंबई मध्ये एक असे आठ पेट्रोल पंप असून त्यापैकी कोल्हापूर जिह्यातील बिद्री, परिते, कार्वे, नेसरी व वडगाव अशा पाच पेट्रोल पंपावर सोलर पॅनल बसविण्यात येणार असून यासाठी प्रेट्रोलियम कंपनी कडून अनुदान मिळेल का यासाठी सध्या चाचपणी सुरु असुन संघाने या सोलर पंपासाठी जाहीराती द्वारे निविदा मागविल्या असून त्यात बिद्री कागल साठी अंदाजे 10 कि.वॅट, शाहू नगर परिते साठी 5.40 कि.वॅट,कार्वे चंदगड साठी 5.40 कि.वॅट,नेसरी गडहिंग्लज साठी 5.40 कि.वॅट तर वडगाव हातकणंगले साठी 10.80 कि.वॅट चे सोलर बसवण्यात येणार असून यातुन निर्माण होणारी वीज ही महावितरण ला जाणार आणि पेट्रोल पंपा साठी खर्च होण्राया विजेचे बिल ज्यात्या महीन्यात होऊन वीज जास्त लागली तर वरचे पैसे संघाला भरावे लागणार आहेत. यासाठी संघाने निविदा मागविल्या असून ज्या कंपनी कडून कमी निविदा येईल ती बोर्ड मिटींग मध्ये अंतीम होईल. यासाठीचा येणारा सर्व खर्च हा संघा कडून केला जाणार असून शासनाकडून संबधीत कंपनी संघाला एका पंपासाठी अंदाजे दोन लाख अनुदान मिळवून देणार आहे.
संध्या पेट्रोल पंप चालवताना विविध अडचणी येत असुन त्यापैकी बर्याच अडचणी या थेट लाईटच्या वापराशी आणि खर्चाशी संबंधित असतात. साधारणपणे, पेट्रोल पंप 24/7 चालु असतात आणि त्यांना इंधन डिस्पेंसर, दिवे, एअर कॉम्प्रेसर इत्यादींसाठी सतत आणि अखंड वीजपुरवठा आवश्यक असतो. सर्वात महत्त्वाची अडचण ही विजेच्या खर्चाची असते. या बिला मुळे नफ्यात फरक पडतो. त्याच बरोबर ग्रामीण भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने जनरेटर वर खर्च होतो तो वेगळाच अशा सर्व अडचणींना तोंड देत नफा कीती राहील हे सांगता येत नाही. त्यामुळे संघाने सौर ऊर्जेच्या वापराचा विचार केला आहे.
- असा आहे वापर व खर्च (महिन्याला होणार साधरण खर्च )
पंप वीज बिल युनिट जनरेटर खर्च
बिद्री 15450/- 1153- 6304/-
परिते 5720/- 474- 5019/-
कार्वे 6050/- 571- 7374/-
नेसरी 5620/- 338/- 6403/-
वडगाव 11790/- 869/- 6361/-
यात महिन्याकाठी पाच पेट्रोल पंपासाठी एकुण 3 हजार 405 युनिट विज लागत असुन त्याचे बिल 45 हजार तर लाईट गेल्या नंतर जनरेटर चा खर्च हा 32 हजाराचा होतो.तर हाच खर्च वर्षाकाठी 9 लाख 14 हजार 92 रुपये होतो.तो सोलर पॅनल बसवले तर वाचणार असून बसवण्यासाठी येणारा खर्च ही दोन वर्षांत निघत असल्याने संघाचा फायदा होणार आहे.
- असा होईल फायदा
वीज खर्चात कपात.
जास्तीत जास्त वापर करता येणार.
सौर पॅनेल बसवून पर्यावरणाचे रक्षण होणार.
शासनाचे अनुदान मिळणार.
देखभाल खर्च कमी
दीर्घकालीन गुंतवणूक.
- संचालक मंडळाच्या बैठकीत होणार निर्णय
सध्या या सौर उर्जा प्रकल्पावर 22 तारखेच्या बोर्ड मिटींग मध्ये चर्चा होणार असुन जी पेट्रोलियम कंपनी आहे त्याच्याकडूनच सौर उजेची कंपनी ठरविण्यात येणार आहे. बोर्ड मिटींग मध्येच हा प्रकल्प चर्चा होऊन फायनल होईल.
ए.आर.मुल्ला.व्यवस्थापकीय संचालक. शेतकरी संघ.