For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऊस दराबाबत शेतकऱ्यांची 12 रोजी दिल्लीत बैठक

06:39 AM Oct 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
ऊस दराबाबत शेतकऱ्यांची  12 रोजी दिल्लीत बैठक
Advertisement

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती

Advertisement

त. भा. वार्ताहर/ हुबळी

ऊस दर ठरविण्यासाठी शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोमवार दि. 12 ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली येथे शेतकऱ्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी शुक्रवारी पत्रकारांना ही माहिती दिली आहे.

Advertisement

आम्ही सर्वाधिकारी नाही, शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन पुढील निर्णय घेण्यासाठीच त्यांची एक बैठक बोलाविण्यात आली आहे, असे सांगतानाच साखरेचे दर घसरल्यामुळे एमएसपी ठरविण्यात आली होती. ठरविलेल्या दरापेक्षा कमी किमतीत साखर विकू नये, असा त्याचा अर्थ होतो. एमएसपीत वाढ केल्यानंतर त्याचा फायदा शेतकऱ्यांनाच होतो असे नाही. एमएसपी व ऊस दर यांचा थेट संबंध नसल्याचे प्रल्हाद जोशी यांनी सांगितले.

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी जारी केल्या आहेत. कर्नाटक, महाराष्ट्र व उत्तर प्रदेशमध्ये इथेनॉलचे उत्पादन वाढले आहे. केंद्र सरकार 1 हजार 200 कोटी लिटर इथेनॉल खरेदी करीत आहे. राज्य सरकारला एसएपी ठरविण्याचा अधिकार आहे. मात्र तसे होताना दिसत नाही, असे सांगतानाच शेतकरी आंदोलनाच्यावेळी आपल्यावर टीका करणारेही आपलेच आहेत. शेतकऱ्यांचे हीत जपताना मतभेदांपेक्षा तोडगा काढणे मुख्य ठरणार आहे, असेही प्रल्हाद जोशी यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.