शेतकरी व लाकूड व्यावसायिकांना जाचक अटींपासून दिलासा द्यावा
शेतकरी लाकूड व्यापारी संघाने
उपवनसंरक्षकांचे वेधले लक्ष
ओटवणे | प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हयातील शेतकरी व लाकूड व्यावसायिकांना स्वतःची झाडे तोडताना व किवा वाहतूक करताना वन खात्याच्या जाचक अटींमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे याबाबत तात्काळ कार्यवाही करून सिंधुदुर्ग जिल्हयातील शेतकरी व लाकूड व्यावसायिकांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकरी लाकूड व्यापारी संघाने एका निवेदनाद्वारे सावंतवाडी वनविभागाचे उपवनसंरक्षक मिलेश शर्मा यांच्याकडे केली आहे. याबाबत दिलेल्या निवेदनानुसार सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी व लाकूड व्यापारी हे स्वतः च्या उदरनिर्वाहासाठी, लग्नकार्य, शिक्षणासाठी किंवा आरोग्याच्या अडचणीसाठी स्वतःचीच झाडे तोडून आपली गरज भागवतात. परंतू शासनाच्या अटी व शर्तीमुळे त्यांना अनेकवेळा समस्यांना तोंड दयावे लागते. याबाबत अनेक वेळा वन अधिकाऱ्यांशी संपर्क साधून चर्चा केली आहे. मात्र केवळ आश्वासना पलीकडे कोणतेही ठोस कार्यवाही होत नाही त्यामुळे शेतकरी व लाकूड व्यावसायिकामध्ये नाराजी आहे.पासकाम याची मुदत संपल्यानंतर सदरची फेरमुदतवाढ पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे रेंजर याचे स्तरावर मिळावी. तसेच पास प्रकरणातील दोन तीन पास शिल्लक राहिले तर ते गावठाण म्हणून फाडले जात होते. हमीपत्रावर कामे चालतात. परंतू काही रेंजमध्ये त्याची पुर्तता होत नाही तरी ती संबधीत रेंजर यांचेशी चर्चा करुन हमीपत्रावरती कामे व्हावीत जेणेकरुन शेतक-यावर विनापरवाना झाड तोडीची वेळ येणार नाही. वर्ग २ ची कामे आजपर्यंत होत आहेत परंतू काही रेंजर करत नाहीत त्या ठिकाणी ती करण्यात यावी. अशी शेतकरी व लाकूड व्यावसायिकांची मागणी आहे.तसेच गेल्या तीन वर्षापूर्वी वाहतूक मालावर शिक्का हा वनपाल यांचेमार्फत दिला जात होता. परंतू आता तो रेजर यांच्या मार्फत दिला जातो. त्यामुळे पु-या रेंजमध्ये एक रेजर्स यांना त्याच्या कामाच्या अभावी तो वेळात मारता येत नाही. यात शेतक-याची व व्यापा-याची फार मोठी अडचण होते. काही वेळा गाड्या सुध्दा उभ्या करुन ठेवाव्या लागतात. तरी सदर शिक्का हा वनपाल यांचेमार्फत मिळावा. वन खात्याने याबाबत गांभीर्यपूर्ण विचार करून याबाबत त्वरीत कार्यवाही करावी आणि शेतकऱ्यांसह लाकूड व्यावसायिकांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी शेतकरी व्यापारी संघाचे अध्यक्ष बाळ भिसे, उपाध्यक्ष लक्ष्मण गावडे, सचिव शिवाजी गवस, सदस्य संजय राऊळ, चंद्रकांत देसाई, सिद्धेश राऊळ, शकील शेख, आनंद गवस आदी उपस्थित होते.