For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Nagaon Village News | शेतकऱ्याच्या घामाचं 'चीज' राखेत! पेडगावमध्ये कांद्याच्या ऐरणीला आग; अडीच लाखांचे नुकसान

03:32 PM Apr 21, 2026 IST | NEETA POTDAR
nagaon village news   शेतकऱ्याच्या घामाचं  चीज  राखेत  पेडगावमध्ये कांद्याच्या ऐरणीला आग  अडीच लाखांचे नुकसान
Advertisement

                                      पेडगावमध्ये कांदा ऐरणीला आग

Advertisement

वडूज : कांद्याच्या ऐरणीला आगलागून शेतकऱ्याचे दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना पेडगाव (ता. खटाव) येथे रविवारी १९ रोजी रात्री पावणे अकरा बाजण्याच्या सुमारास घडली.याबाबत सतीश शंकर जगदाळे (रा. बाकेश्वर) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीतील माहितीनुसार, पेडगाव गावच्या हद्दीत बेंद नावाच्या शिवारात जगदाळे यांची शेतजमीन आहे. येथे त्यांनी सुमारे ४५० ते ४७५ कांद्याच्या पोत्यांची ऐरण लावून ठेवली होती. जगदाळे काल सायंकाळी पावणे सातच्या सुमारासकांद्याच्या ऐरणीची साफसफाई करून घरी परतले होते. त्यानंतर रात्री पावणे अकराच्या सुमारास पेडगाव येथील अक्षय जगदाळे यांनी कांद्याच्या ऐरणीला आग लागल्याचे सांगितले.

त्यावेळी जगदाळे व त्यांचे मित्रमागील वर्षी याच ठिकाणी कांदा ऐरणीचे प्लास्टिक कागद व इतर साहित्याची नासधूस करण्यात आली होती. तर सहा महिन्यांपूर्वी पाइपलाइन दारी, इलेक्ट्रिक मोटार मोडतोड करून नुकसान करण्यात आले होते. याबाबत वडूज पोलीस ठाण्यात तक्रार वाखल करण्यात आली होती. मात्र संबंधित इसमावर कारवाई न झाल्याने विकृत मनोवृत्तीच्या लोकांचे मनोधैर्य वाढल्याने आज लाखो रुपयांची हानी झाल्याची चर्चा आहे.अशोक फडतरे हे दोघे पेडगावला गेले. त्यावेळी जगदाळे, फडतरे तसेच एकनाथ जगदाळे, अक्षय जगदाळे, नानासाहेब जगदाळे व अन्य ग्रामस्थांनी ही आग विझविली. आगीत जगदाळे यांच्या कांद्याच्या सुमारे ४५० ते ४७५ पिशव्या जळून दोन ते अडीच लाखांचे नुकसान झाले. आगीचे नेमके कारण समजले नाही. जगदाळे यांनी पोलिसांत फिर्याद दिली असून तपास हवालदार एस. एस. साळुंखे करीत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.