वसगडेत शेतकऱ्यांचा पुन्हा रेलरोको
सांगली :
पुणे -मिरज-लोंढा रेल्वे मार्गावरील दुहेरी करताना वसगडेतील शेतकऱ्यांच्या जमिनी रुळाखाली गेल्या होत्या. शेतीकडे जाण्यासाठी रस्ता ही उरला नव्हता. याबाबत तीन वर्षापासून पाठपुरावा सुरू होता पण रेल्वे विभाग दाद घेत नसल्याने शेतकऱ्यांनी दुसऱ्यांदा रेलरोको आंदोलनाचे हत्यार उगारले. शेतक्रयाच्या हद्दीत असणाऱ्या रुळावर ठिय्या आंदोलन करीत सायंकाळी ४.३० मालवाहतूक करणारी रेल्वे शेतकऱ्यांनी अडवून धरली.
दरम्यान दीड वर्षापूर्वी रेल्वे बाधित शेतकऱ्यांनी कोल्हापूर-गोंदिया सुमारे चार तास थांबवली होती. त्यानंतर लोकप्रतिनिधी, अधिकारीयांच्यात झालेल्या बैठकीत भरपाई देण्याचे ठराव घेण्यात आले. तसे आश्वासन दिले. परंतु अधिकायांनी जमिनीची भरपाई देणार नाही असा पवित्रा घेत, शेतक्रयांची नावे बगळ्याने संताप अनावर झाला. शेतकऱ्यांनी शनिवारी १० मे पासून ठिया आंदोलनाला सुरुवात केली. प्रशासन दाद देत नसल्याने मंगळवारी सायंकाळी रुळावर ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली. जमीन अधिग्रहण न करता शेतकऱ्यांच्या हद्दीत रूळ टाकून दोन वर्षापासून रेल्वे धावत आहे. मात्र शेतक्रयांना भरपाई देत नाही त्यामुळे आक्रमक बनले. एप्रिल महिन्यामध्ये जिल्हाधिकारी यांच्यासोबत झालेल्या निर्णयानुसार रेल्वेने ५ मेपर्यंत भरपाईची प्रस्ताव सादर करायचा होता. परंतु आजअखेर प्रस्ताव सादर न केल्यामुळे शेतक्रयांना आज आंदोलन करण्याची वेळ आली. आदेशाचा प्रस्ताव मिळत नाही तोपर्यंत जागा सोडणार नाही. असा निर्णय शेतकयांनी घेतला. सायंकाळी अडवलेली मालवाहतूक प्रशासनाच्या मागणीनुसार सोडली. पण पुणे-कोल्हापुर पॅसेंजर अडवली.
- उड्डाण पुलाचे अनौपचारिक उद्घाटन...
रुळावरील उड्डाणपूलाचे काम दोन वर्षापासून सुरू आहे. ते काम अंतिम टप्प्यात आहे. शेतकयांनी रेल्वे अडवल्यामुळे दुचाकी वाहनधारकांनी वाहने उड्डाणपुलावरून प्रवास सुरू ठेवलेला बाहतूक सुरळीत झाल्याने दुचाकी व चारचाकी धारकांना भिलवडी स्टेशन मार्गे प्रवास करावा लागला. त्यामुळे पूलाचे अनौपचारिक उद्घाटन झालं असंच म्हणावं लागेल.