कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई मिळावी

05:37 PM Jun 04, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

ठाकरे शिवसेनेचे कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे यांना निवेदन

Advertisement

कुडाळ -

Advertisement

सध्या झालेल्या अवकाळी अतिवृष्टीमुळे कुडाळ तालुक्यातील शेतकरी व बागायतदारांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.तसेच काही लोकांच्या घरांचेही मोठे नुकसान झाले आहे.या नुकसानीचे सरसकट तात्काळ पंचनामे करून नुकसाई भरपाई मिळावी.पंचनामा करताना जाचक अटी लावू नयेत.नुकसान भरपाईसाठी आपण पाठपुरावा करावा,अशी मागणी शिवसेना उ‌द्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कुडाळ तालुक्याच्या वतीने कुडाळचे तहसीलदार वीरसिंग वसावे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. अवकाळी पावसाने झोडपून काढले.त्यामुळे कोकम, भुईमूग , कलिंगड,काजू,आंबा यासह अन्य पिकांचे मोठे नुकसान होऊन शेतकरी व बागायतदार आर्थिक संकटात सापडला. या शेतकऱ्यांना शासनाने नुकसान भरपाई देऊन दिलासा द्यावा.म्हणून कुडाळ तालुका उबाठा पक्षाने तहसीलदार श्री वसावे यांची भेट घेतली.उबाठाचे उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे , कुडाळ शहर प्रमुख संतोष शिरसाट ,पंचायत समिती माजी सदस्य अतुल बंगे, युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट , कुडाळ शहर निरीक्षक सुशील चिंदरकर, उपताप्रमुख बाळा कोरगावकर, विभागप्रमुख गंगाराम सडवेलकर, युवासेना कुडाळ शहरप्रमुख संदीप म्हाडेश्वर,उपशहर प्रमुख गुरुनाथ गडकर, उपविभागप्रमुख मंगेश बांदेकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.तसेच पडझड होऊन काही लोकांच्या घराचेही नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानग्रस्तांना शासनाकडून आर्थिक मदत मिळाली पाहिजे. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करताना कोणत्याही जाचक अटी न लावता सरसकट पंचमाने करून त्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी. यासाठी आपण तात्काळ पाठपुरावा करावा,अशी मागणी निवेदनात केली आहे. तसेच काही अधिकारी नुकसानीची पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत.शेतकऱ्यांना काही अधिकारी उद्धट उत्तरे देत आहेत.आपण अधिकाऱ्यांना तात्काळ शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत,असे म्हटले आहे.

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update # konkan update # kudal # shivsena #
Next Article