For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

शेतकऱ्यांचे आज राज्यभरात आंदोलन

06:45 AM Nov 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
शेतकऱ्यांचे आज राज्यभरात आंदोलन
Advertisement

ऊस दरवाढ, कर्जमाफीची मागणी : जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर करणार निदर्शने

Advertisement

त. भा. प्रतिनिधी/ बेंगळूर :

ऊस दरात वाढ आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांच्या पूर्ततेच्या मागणीसाठी शेतकरी संघटना मंगळवारी राज्यव्यापी आंदोलन करणार आहे. राज्य ऊस उत्पादक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष कुरुबुरु शांतकुमार यांनी याविषयी माहिती दिली आहे. मंगळवार दि. 3 नोव्हेंबर रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर निदर्शने केली जातील. तसेच, 5 नोव्हेंबर रोजी बेंगळूरच्या फ्रीडम पार्कवर आंदोलन आयोजित करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.

Advertisement

उसासाठी एसएपी दर जाहीर करावा, अशी मागणीही कुरुबुरु शांतकुमार यांनी राज्य सरकारकडे केली. इतर राज्यांनी उसाला यापूर्वीच अशी किंमत निश्चित केली आहे. पंजाबमध्ये 4,480 रुपये प्रति टन, तामिळनाडूमध्ये 4,000 रुपये आणि उत्तर प्रदेशमध्ये 4,200 रुपये प्रति टन इतका दर घोषित करण्यात आला आहे.

शांतकुमार यांनी केंद्र सरकारकडे देखील उसाचा एफआरपी वाढविण्याचे आवाहन केले. उत्पादन खर्च वाढत असल्याने, 10 ते 12.5 टक्के साखर उताऱ्याच्या आधारावर एफआरपी वाढवून 4,500 रुपये प्रति टन करावा, अशी मागणी त्यांनी केली.

उत्तर कर्नाटकात उसाला 4,000 रुपये प्रति टन दर देण्याची घोषणा करणारे साखर कारखाने सुरू करण्यास कोणतीही हरकत नाही. ऊस उत्पादकांची होणारी पिळवणूक रोखण्यासाठी सरकारने रिकव्हरी मोजणी आणि वजन प्रक्रियेबाबत कठोर व पारदर्शक उपाययोजना केल्या पाहिजेत, अशा मागण्याही कुरुबुरु शांतकुमार यांनी केले

राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी. तसेच, राज्यभरात आंदोलनांमध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांवरील पोलीस खटले मागे घेण्याची मागणीही त्यांनी केली.

या मागण्यांसाठी मंगळवारी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शेतकरी मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयांना घेराव घालणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवाय, राज्यातील विविध शेतकरी संघटनांच्या ऊस उत्पादक समन्वय समितीतर्फे 5 नोव्हेंबर रोजी बेंगळूर येथील फ्रीडम पार्कमध्ये धरणे आंदोलन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.