कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शेतकरी आंदोलनाला मुधोळ येथे गालबोट

12:47 PM Nov 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

उसाने भरलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉली पेटविल्या : 50 ट्रॅक्टरसह अनेक दुचाकी भस्मसात

Advertisement

वार्ताहर/जमखंडी 

Advertisement

मुधोळ येथे ऊस दराकरिता सुरू असलेले आंदोलन गुरुवारी सायंकाळी पेटले असून महालिंगपूर जवळील समीरवाडी (सैदापूर) येथील गोदावरी साखर कारखान्याच्या परिसरात उभ्या असलेल्या उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉली पेटविण्यात आल्या. काही ट्रॉली उलटण्यात आल्या. यात 50 ट्रॅक्टर-ट्रॉलांसह अनेक दुचाकी भस्मसात झाल्याची दुर्घटना घडली. शेतकऱ्यांचा मोर्चा मुधोळहून समीरवाडी फॅक्टरीकडे जाताच पोलिसांनी त्यांना रोखले. दरम्यान काहींनी पोलिसांवर दगडफेक केल्याने त्यात पोलीस अधिकाऱ्यांसह काही पोलीस व शेतकरी जखमी झाले असल्याचे कळते.

बागलकोटचे जिल्हाधिकारी संगप्पा यांनी गुरुवार दि. 13 रोजी रात्री 8 पासून जमखंडी, मुधोळ, रबकवी-बनहट्टी या तालुक्यांमध्ये जमावबंदी आदेश जारी केला असून यादरम्यान कोणताही मोर्चा, निदर्शने, सभा घेण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश दि. 16 रोजी सकाळी 8 पर्यंत लागू करण्यात आला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सदर घटनेची माहिती जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क साधून घेतली असून जिल्हा पालकमंत्री आर, बी, तिम्मापूर यांना बेंगळूरला बोलावले आहे.

जिह्यातील समीरवाडी येथील उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीना आग लावण्याची घटना अत्यंत दु?खद असल्याची प्रतिक्रिया बागलकोट जिल्हा पालकमंत्री आर बी तीम्मापूर यानी व्यक्त केली. राज्य सरकारने प्रति टन उसाला साखर कारखान्यानी 3250 व सरकार 50 रुपये असे एकूण 3300 रुपये  रिकवरी आधारे देण्याचे जाहीर केले होते. पण हा  आदेश मुधोळ येथील शेतक्रयांनी मान्य न करता   3500 रुपये देण्याची मागणी करून गेल्या पाच दिवसापासून मुधोळ येथे आंदोलन सुरू केले होते. दरम्यान जिल्हा प्रशासन व आपण शेतकरी प्रमुख व साखर कारखानदार यांची बैठक घेऊन चर्चा केली होती.

रिकवरी आधारे दर निश्चित करण्याऐवजी सरसकट 3300 रुपये द्यावेत व मागील वर्षातील बाकी देऊन साखर कारखाने सुरू करावेत अशी चर्चा झाली होती व याला सहमती दर्शविली होती. हा निर्णय सायंकाळी घेण्याकरता मुधोळ येथील तहसील कार्यालयात जिल्हा प्रशासन अधिकारी व साखर कारखानदार उपस्थित होते पण त्या अगोदर शेतक्रयांचा मोर्चा समीरवाडीकडे गेला होता. व ही घटना घडली असून आपण उत्पादन केलेल्या पिकाचे नुकसान शेतकरी करणार नाहीत तरीपण याचा तपास पोलीस करून कारवाई करतील. यादरम्यान जिल्हा अतिरिक्त पोलीस प्रमुख पण यात जखमी झाले असून ही अत्यंत दु?खद घडली असल्याचे सांगून त्यांनी खेद व्यक्त केला. शेतकरी, साखर कारखानदार यांच्यात सौहार्द पूर्ण वातावरण असावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article