चर्चा फिस्कटली.....शेतकरी संघटना आणि साखर कारखानदार यांच्यात संघर्ष अटळ
जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, साखर कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनांमध्ये सुरू असलेली प्रदिर्घ चर्चा फिस्कटली असून आपल्या मागण्यांवर ठाम असलेल्या शेतकरी संघटनेने साखर कारखानदारांचा प्रस्ताव फेटाळला. तसेच शासनाने जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेली कृती समितीचा अहवालही फेटाळला असून येत्या रविवारी 19 नोव्हेंबरला जिल्ह्यात चक्काजाम आंदोलन होणारच असा आवाहन राजू शेट्टी यांनी शेतकरी संघटनांमार्फत म्हटले आहे.
गत हंगामातीस उसाचा दुसरा हप्ता 400 रूपये अधिक यावर्षीच्या ऊसाला 3500 रूपये दर मिळालाच पाहीजे यामागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन सुरु केले आहे. यासंदर्भात पहिल्या बैठकीच्या अपयशानंतर आज साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनेच्या नेत्यांमद्ये दुसरी बैठक जिल्हाधिकारी कार्यलय, कोल्हापूर येथे पार पडली. शेतकरी संघटनेने साखर कारखानदारांची
अत्यंत खडाजंगीत पार पडलेल्या या दुसऱ्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे कि, "मागील हंगामातील 400 रुपये देता येईल का नाही यासाठी कमिटी स्थापन करण्याची पालकमंत्री मुश्रीफ यांनी प्रस्ताव ठेवला होता. पण पालकमंत्र्यांनी दिलेला प्रस्ताव आम्ही फेटाळला आहे. बराच वेळ चाललेल्या चर्चेतून फार काही निष्पन्न झाले नाही. तसेच ज्यांनी 3000 हजार दर जाहीर केला आहे त्यांनी 3100 रुपये दर द्यावा असंही सुचविण्यात आले पण ते आम्हाला मान्य नसल्याने बैठक निष्फळ ठरली. त्यामुळे आता रविवारी 19 तारखेला जिल्ह्यात चक्काजाम आंदोलन होणारचं." असा एल्गार राजू शेट्टी यांनी दिला.
मग त्यांच्याशीच चर्चा करा.....
उसदरासंदर्भात बोलताना शेतकरी कृती समितीवर भाष्य करताना राजू शेट्टी चांगलेच फटकारले. गेल्या तीन दिवसात स्थापन झालेल्या शेतकरी कृती समिती ही कारखानदारांच्या बगलबच्च्यांनी मिळून बनवलेली आहे. कारखानदारांना कृती समितीचे ऐकायचे असेल तर त्यांनी त्यांच्याशीच चर्चा करावी. असेही ते म्हणाले.