रत्नागिरी-नागपूर महामार्गा भुसंपादनास शेकऱ्यांचा विरोध
विरोध करणाऱ्या शेतक-यांना हातकंणगले पोलिसांनी घेतले ताब्यात
राजू शेट्टीनीं दिला इशारा
कोल्हापूर
रत्नागिरी - नागपूर महामार्गाला चौपट मोबदला दिल्याशिवाय मोजणीस शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. विरोध केल्यावर जबरदस्तीने भुसंपादनासही विरोध करणाऱ्या शेतक-यांना हातकंणगले पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. गेल्या वर्षभरापासून शेतकरी व राज्य सरकार विरोधात हा संघर्ष सुरू असून पोलिस बळाचा वापर करून बळजबरीने रस्ता करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
शेतकऱ्यांना कोणतीही नोटीस न देता हुकुमशाही पध्दतीने भुसंपादन केले जात आहे. राजू शेट्टी यांनी थेट हातकंणगले पोलिस ठाण्यात शेतकऱ्यांची भेट घेऊन मोजणी थांबविण्यास सांगितले. शेतक-यांच्या विरोधात बळजबरीचा वापर केल्यास राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सांगली कोल्हापूर महामार्ग बेमुदत बंद करणार असल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी यावेळी दिला.