For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कंग्राळी खुर्द येथील शेतकऱ्यांनी श्रमदानातून तयार केला बंधारा

06:07 AM Sep 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
कंग्राळी खुर्द येथील शेतकऱ्यांनी  श्रमदानातून तयार केला बंधारा
Advertisement

वार्ताहर/ कंग्राळी बुद्रुक

Advertisement

कंग्राळी खुर्द येथील केवळ डझनभर शेतकऱ्यांनी एकत्र येऊन श्रमदानातून चिखल मातीचा बंधारा घातला असून या बंधाऱ्यामुळे अडलेल्या पाण्याचा 100 एकरपेक्षा अधिक भात शेतीला उपयोग होणार असल्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

कंग्राळी खुर्द गावच्या दक्षिण दिशेला कुमारस्वामी लेआऊटच्या खालच्या बाजूला श्री लक्ष्मी तलाव आहे. पाऊस लांबल्यास या तलावाचे पाणी भात शेतीला सोडता येते. पण हे पाणी शेतवडीत जाण्यासाठी पक्का कालवा व बंधारा नाही. यामुळे काही मोजके शेतकरी अशाप्रकारे एकत्र येऊन श्रमदानाने या ठिकाणी मातीचा बंधारा बांधून भातशेतीला पाणी सोडले जाते. आता पाऊस कमी झाला असून कडक ऊन पडत असल्यामुळे शिवारातील पाणी आटत आहे. सहसा भातपिके पोटरीला आहे व सध्या पावसाची नितांत गरज आहे. म्हणून गावातील शेतकऱ्यांनी यामध्ये वामन पाटील, आप्पा पाऊसकर, सुधाकर पाटील, पुंडलिक पाटील, दीपक निळकंठाचे, पी. डी. पाटील, विनय पाटील, बाळू पाटील, टी. डी. पाटील, नामदेव जाधव, संजय पाटील, सचिन बेन्नाळकर या 12 शेतकऱ्यांनी मोठ्या हिमतीने गुरुवारी सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत 15 फूट लांब 2 फूट रुंदी व 3 फूट उंचीचा चिखल मातीचा बंधारा अगदी विश्रांती न घेता घातला. तसेच 150 फूट लांबीचा कालवा गाळमुक्त केला व भातशेतीला पाणी सुरू केल्यामुळे इतर शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.