शेतकरी सन्मान योजना ठरतेय भुलभुलैया
कडेगांव / हिराजी देशमुख :
केंद्र शासनाने पी.म.किसान ही योजना शेतकऱ्यामध्ये राबवली. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी सात हजार रूपये टप्याटप्याने दिले जातात. याच पार्श्वभूमिवर महायुतीच्या सरकारने गतवर्षी राज्य शासनातर्फे देखील शेतकऱ्यांना मदत करण्याची घोषणा केली गेली. त्यानुसार गतवर्षी राज्य शासनाचे ६ हजार आणि केंद्र शासनाचे ६ हजार, अशी मदत देण्यात आली होती. परंतू यापैकी राज्य शासनाचे पैसे अनेक दिवस झाले तरी शेतकऱ्यांना प्राप्त झाले नसल्याने ही योजना भुलभुलैया ठरली आहे. गेल्या वर्षी केंद्र सरकारच्या पंतप्रधानमंत्री पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पार्श्वभूमिवर राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे. या दोन्ही योजनांमधून शेतकऱ्यांना वार्षिक १२ हजार रूपये अनुदान मिळत होते.
विधान सभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर केंद्र आणि राज्य शासनाचे पैसे जमा झाले. मात्र त्यानंतर राज्य सरकारकडील घोषित रक्कम मिळाली नसल्याने शेतकरी चक्रावून गेले आहेत.
- फार्मर आयटी सक्तीचे
शेतकऱ्यांकडे जमिनीचा सातबारा असतो. ज्यांच्याकडे सातबारा आहे, तो शेतकरी हे त्रिकाल बाधित सत्य आहे. तरी शासनाने फार्मर आयडीची मेख मारून ठेवली आहे. अनेक शेतकरी फार्मर आयडी काढण्यासाठी महा ई सेवा केंद्रामध्ये हेलपाटे मारत आहेत. जर फार्मर आयडी नसेल तर पीएम किसान योजनेचे पैसे मिळणार नाहीत, अशी भीती शेतकऱ्यांना दाखवून त्यांचा सर्व खात्यांचे सातबारा नंबर असे शेकडो रूपये खर्च झाले आहेत.
- नमो शेतकरी योजना रजिस्ट्रेशन
नमो शेतकरी योजनासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांना पी.एम. किसान सन्मान निधीचे अनुदान मिळत आहे. त्या सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभमिळत आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप पी.एम. किसान सन्मान निधी योजनेसाठी अर्ज केलेला नाही. त्यांनी लवकरात लवकर अर्ज करून या दोन्ही योजनांचा लाभ करून घ्यावा, असे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले होते.
- शेतकऱ्यांना हप्त्याची आशा
केंद्राच्या धर्तीवर राज्य शासनानेदेखील नमो शेतकरी योजना राबविण्याचा निर्णय घेतला. निवडणुकीच्या अगोदर केंद्राचे ६ हजार आणि राज्य शासनाचे ६ हजार, असे दोन हप्ते खात्यावर जमा झाले. मात्र त्यानंतर हा निधी प्राप्त झाला नाही. हे पैसे खात्यावर येतील, या आशेवर शेतकरी बसले आहेत.
- परशुराम माळी, तालुकाध्यक्ष शेतकरी संघटना ,कडेगाव