For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur News | थकीत ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा अर्धनग्न मोर्चा

02:26 PM Jun 05, 2026 IST | NEETA POTDAR
solapur news   थकीत ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा अर्धनग्न मोर्चा
Advertisement
गोकुळ साखर कारखान्याकडील थकीत ऊस बिलाच्या मागणीसाठी आंदोलन
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ साखर कारखान्याकडील थकीत ऊस बिलाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी गुरुवारी (दि. ४) पूनम गेट ते सह प्रादेशिक साखर कार्यालय असा अर्धनग्न मोर्चा काढून जोरदार आंदोलन केले.
साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी मुख्यमंत्री स्तरावर बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी सह प्रादेशिक साखर कार्यालयासमोरील आंदोलन मागे घेतले. मात्र, थकीत बिले मिळेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरील आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला आहे.
गोकुळ साखर कारखान्याकडील थकीत ऊस बिलासाठी धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील शेकडो शेतकरी गेल्या अकरा दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करत आहेत. आंदोलनाच्या अकराव्या दिवशी शेतकऱ्यांनी अर्धनग्न मोर्चा काढून सह प्रादेशिक साखर कार्यालयासमोर दोन तास ठिय्या आंदोलन केले.
यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने प्रभारी साखर सहसंचालक आबासाहेब गावडे यांनी आंदोलकांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून शेतकरी नेते ॲड. अमोल पाटील, अरविंद गोडके आणि माजी पंचायत समिती विरोधी पक्षनेते बाळासाहेब मोरे यांच्याशी संवाद घडवून आणला.
मुख्यमंत्री पातळीवर बैठक घेऊन प्रश्न सोडविण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलकांनी सह प्रादेशिक साखर कार्यालयातील आंदोलन मागे घेतले
Advertisement

Advertisement
Tags :

.

© Copyright, All Rights Reserved.