कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सांगली, तासगावच्या शेतकऱ्यांची सांगलीत थेट ग्राहकांना द्राक्षविक्री

05:47 PM Feb 23, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

 सांगली :

Advertisement

सांगली आणि तासगाव परिसरातील शेतकऱ्यांनी सांगलीत ग्राहकांना थेट द्राक्ष विक्रीचा गेले काही वर्षे पायंडा पाडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हातात पैसा येण्यासोबतच ग्राहकांना देखील शंभर रुपयांत किलो ते दीड किलो उच्च दर्जाची द्राक्षे मिळत आहेत. सांगली बरोबरच शेजारच्या कोल्हापूर, इचलकरंजी, कराड, जयसिंगपूर, हुपरी, कागल, निपाणी पर्यंत विक्रीची व्यवस्था उभा करण्याचा प्रयत्न युवा शेतकरी करताना दिसत आहेत.

Advertisement

सांगलीच्या स्टेशन चौकासह राममंदिर चौक आणि अन्य मोक्याच्या ठिकाणी जागा पटकावून काही शेतकरी द्राक्ष विक्री करताना दिसत आहेत. यातील काहींनी आपल्या बागा घालवल्या आहेत. राखून ठेवलेला माल त्यांना उच्च दराने सांगलीत विकणे सोयीचे ठरते. चार किलोच्या पटीत व्यापाऱ्यांना घाऊक माल घालताना त्यांच्या हाती पुरेशी रक्कम येत नाही. बदलत्या हवामानामुळे खर्च वाढतो. यावर उपाय म्हणून काही द्राक्षे शहरात आणून विकायला ते प्राधान्य देतात. आपल्याकडे द्राक्षे संपली की आसपासच्या शेतकऱ्यांकडून घेऊन ते विक्री सुरू ठेवतात. नाशिकप्रमाणे द्राक्षांच्या ओळी वेगवेगळ्या अंतराने व्यापाऱ्यांना विकता येतील का याचा विचारही सद्या यातील काही शेतकरी करत आहेत. ज्यामुळे त्यांना आपल्या बागेतील माल वेगवेगळ्या वेळी विक्रीस आणून गरज पूर्ण करता येईल. तसेच नाशवंत असल्याच्या भीतीने एकाचवेळी द्राक्षांची गर्दी झाल्याने पडणाऱ्या दराच्या संकटातून मुक्तता होईल असा प्रयत्न यापैकी काही शेतकरी करताना दिसत आहेत.

दरम्यान शहरातील या शेतकरी विक्रेत्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न काही विघ्नसंतोषी मंडळींनी गतवर्षी करून महापालिकेकडे तक्रार केली होती. मात्र जनसेवा भाजीपाला संघटनेचे अध्यक्ष शंभूराज काटकर यांनी या शेतकऱ्यांना काही काळा पुरतीच ही जागा आवश्यक असते. त्यांचा अडथळा वाहतुकीला होत नाही. शिवाय त्यांच्यासाठी विक्रीची चांगली व्यवस्था नाही त्यामुळे त्यांना न हटवता प्रशासनाला आवश्यक वाटते तेवढ्या मागे त्यांना बसविण्यात यावे अशी भूमिका घेतली. त्याला महापालिका व पोलिसांनीही प्रतिसाद दिला. या शेतकऱ्यांना आता आपल्या कुटुंबातील युवकांना सांगली, मिरज, कुपवाड, इचलकरंजी, जयसिंगपूर अशा आसपासच्या शहरांबरोबर एस टी प्रवासाने पोहोचून विक्री करता येईल अशा ठिकाणी व्यवसाय वाढविण्याची इच्छा प्रबळ होऊ लागली असून यावर्षी यातील काही त्या शहरांमध्ये विक्रीला जाण्याच्या तयारीत आहेत.

तासगाव आणि आसपासच्या तालुक्यातील उत्तम दर्जाचे द्राक्षे सद्या सांगलीत उपलब्ध आहेत. एरव्ही जादा किंमतीला घ्यावे लागणारे हे द्राक्षे शेतकऱ्यांकडून खरेदी करताना शंभर रुपयांना किलो पासून सव्वा आणि दीड किलो या प्रमाणात मोल भाव करून महिला खरेदी करताना दिसत आहेत. शेतकऱ्यांनी केलेली ही विक्री त्यांना फायदा देतेच शिवाय ग्राहकांना देखील लाभ देऊ लागली आहे.

 

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article