For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Agriculture News | शेतकऱ्यांनो, चुकूनही ही घाई करू नका! मान्सूनपूर्वीच्या पावसाबाबत कृषी विभागाचा मोठा इशारा

01:51 PM Jun 01, 2026 IST | NEETA POTDAR
agriculture news   शेतकऱ्यांनो  चुकूनही ही घाई करू नका  मान्सूनपूर्वीच्या  पावसाबाबत कृषी विभागाचा मोठा इशारा
Advertisement

                         शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये; कृषी विभागाचे आवाहन

Advertisement

मुंबई -राज्यातील हवामानात बदल होण्यास सध्या सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांनी वादळी पावसावर अवलंबून आणि मान्सूनचे आगमन होण्यापूर्वी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे.१ जूनपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात हवामानात वेगानेबदल होत जाणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

शेतकरी आणि लोकांना आवाहन करण्यात येत आहे की, संभाव्य हवामान बदल लक्षात घेऊन योग्य ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी. आगामी वादळी पावसाचा मान्सूनशी काहीही संबंध नाही,कारण मान्सून अद्याप केरळममध्ये पोहोचलेला नाही. राज्यातील बहुतांश भागांमध्ये किमान १० जूनपर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही.

Advertisement

यामध्ये प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खानदेशात दुपार नंतरचे ढग आणि काही प्रमाणात वादळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. कोकणातही काही प्रमाणात पावसाचा अंदाज आहे. मे महिन्याच्या तुलनेत राज्यातील कमाल तापमानात घट होईल, मात्र विदर्भातील काही भागांमध्ये, प्रामुख्याने पूर्व विदर्भ, कमाल तापमान ४० अंशाच्या वर कायम राहणार आहे.

Advertisement
Tags :

.