गाय दूध दर कपात विरोधात शेतकरी आक्रमक
रस्त्यावर दूध ओतून दूध केला दर कपातीला विरोध
कोल्हापूर
गाय दूध खरेदी दरात कपात केल्यानंतर गाय दूध उत्पादक शेतकरी चांगलेच संतप्त झालेत. दूध संघाने गाय दूध खरेदी दरात तीन रुपयाची कपात केल्यानंतर गाय दूध उत्पादक शेतकरी देशोधडीला लागण्याची वेळ निर्माण झाली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कोल्हापुरातील शिवाजी पुल इथं आंदोलन केल आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून शेतकऱ्यांनी कॅनमधून आणलेलं दूध शिवाजी फुलावर ओतून दिले. दुधाला किमान 40 रुपये दर मिळाला पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. दुधालाही एफ आर पी व रेवेन्यू शेअरिंग चे धोरण लागू करावे, दूध मूल्य आयोगाची स्थापना करावी, पशुखाद्य व पशु औषधांचे दर नियंत्रित करावे यासह अन्य मागण्या आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत.
गेले सात महिन्यांपासून सरकारने गायीच्या दूधावर ५ रुपये अनुदान जाहीर केले होते, त्यानंतर ७ रुपये अनुदार जाहीर केले. पण हे अनुदान कागदावर राहीलेले आहे. गोकूळ दूध किंवा राज्यातील इतर दुधसंघांनी आम्हाला फक्त आश्वासन दिले, की पशू खाद्याचे दर कमी करतो आणि गायीच्या दूधाच्या दरात वाढ करतो. पण त्यांनी असे केले नाही. तर गायीच्या दूधात चार रुपयांनी कपात झाली असताना परत एकदा तीन रुपये कपात झाली आहे. या संदर्भात वारंवर निवेदन देऊन सुद्धा कोणताही निर्णय घेतला गेलेला नाही त्यासाठी आम्ही आज हे आंदोलन केलेले आहे, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
आज दूध शेती तोट्यात चालली आहे. जनावरांची वैरण, औषध महाग झालेली आहेत. दुधाचा शेतकरी हा १५ ते २० रुपये तोट्यात आहे. जर सरकारने आम्हाला ४० रुपये दर दिला नाही तर मंत्र्यांच्या दालनामध्ये मंत्रालायामध्ये दूध ओतल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. ऊसाप्रमाणे दुधालाही एफआऱपी मिळणे गरजेचे आहे. सरकार योग्य दर देत नसल्याने त्याच्या निषेधार्थ आम्ही हे आंदोलन छेडलेले आहे. दुध रस्त्यावर आणि नदीत ओतले आहे. आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर दुग्धविकास मंत्र्यांना अभिषेक घातल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया आंदोलक माणिक पाटील यांनी यावेळी दिली.