शक्तीपीठ महामार्ग विरोधात शेतकरी आक्रमक
१२ मार्चला आझाद मैदानावर मोर्चा
शक्तिपीठ बाबत जिल्ह्यातील आजी-माजी खासदार आमदारांनी पत्र देऊन आपली भूमिका स्पष्ट करावी, आमदार सतेज पाटलांचे आव्हान
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी
राज्यात कायदा व सुव्यवस्थेवर आमदार सतेज पाटील यांनी उभे केले प्रश्नचिन्ह
कोल्हापूर
सत्ताधारी पक्षाचे पालकमंत्री महामार्ग होणार नाही म्हणतात, मात्र शहरातील आमदार व्हावं म्हणून पाठिंबा देतात. सरकारकडून खडा टाकून बघण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशातील ज्या निवडणुका झाल्या, ते त्याच जणांसाठी ४ प्रकल्प ठरले. या रस्त्यामुळे शेतकऱ्यांचं आयुष्य बरबाद होणार आहे. कॉन्ट्रॅक्टरसाठी केलेला हा रस्ता आहे. सरकारच पैशाच गणित काय समजत नाही. देशात सिमेंट फॅक्टरी केवळ ५ जणांची, स्टील फॅक्टरी केवळ ५ जणांची. कोणाच तर माल खपवायचं आहे म्हणून हे सर्व सुरू आहे. मग शेतकरी देशोधडीला लागला तरी त्यांना चालेल. काहीजण कोर्टात जा म्हणत आहेत. मात्र आम्ही कोर्टाचा अनुभव पाहिला आहे. शिवसेना फुटली, राष्ट्रवादी फुटली, १२ आमदारांच्या संदर्भात कोर्टात गेलो, तेव्हा काय निर्णय आला, माहित आहे. आपल्यापैकी जो कोर्टात जाईल तो फितूर असेल. १ तारखेपर्यंत आपापल्या जिल्ह्यातील आमदार, माजी आमदार, खासदार नेते यांची पत्र गोळा करा. त्यांचं पाठिंबा कोणाला आहे ते, लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका स्पष्ट करावी. चुकीच्या गोष्टीला कोल्हापूरचा विरोध असणारच. दुधाच्या भांड्यात मिठाचा खडा टाकण्याच काम सरकार कडून सुरू झाले आहे. अधिवेशन काळात १२ मार्चला मुंबईत आझाद मैदानात १२ जिल्ह्यातून मोर्चा जाणार. सत्ताधारी विरोधक सगळ्यांना निमंत्रण द्या कोण कोण येतय बघू? असे प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी आपल्या भाषणातून केले.
शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीतर्फे शक्तीपीठ महामार्ग बाधित १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या राज्यव्यापी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार सतेज पाटील यांनी महामार्ग विरोधात भूमिका मांडली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी आल्यानंतर काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण केला आहे. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना सतेज पाटील यांनी राज्यात कायदा व सुव्यवस्था राहिले की नाही याबाबत शंका ही उपस्थित केली आहे. लोकांचा धाडस वाढले आहे. त्यामुळेच आता उपमुख्यमंत्र्यांना धमकी दिली जाते. या संपूर्ण धमकी प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावावा अशी माझी अपेक्षा आहे असं सतेज पाटील यांनी म्हटलं आहे.