Kolhapur News : वारणेत कृषी प्रदर्शन पाहण्यास शेतकरी-नागरिकांची तुडुंब गर्दी
प्रदर्शनात ३०० अंडी देणाऱ्या ब्लॅक ऑस्ट्रेलियन कोंबड्या प्रदर्शनाचा मुख्य आकर्षण
वारणानगर : वारणानगर येथील वारणा समूहाचे संस्थापक सहकारमहर्षि तात्यासाहेब कोरे यांच्या पुण्यस्मरणार्थ आयोजित कृषी प्रदर्शन पाहण्यास तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांसह नागरीकांची तुडूंब गर्दी वाढली आहे.
वारणा समूहाचे प्रमुख आ.डॉ. विनय कोरे यांच्या मार्गदर्शनात वारणा विभाग शेतीपूरक संस्थेच्या माध्यमातून कृषी प्रदर्शन शास्त्रीभवन शेजारील पटांगणावर भरविण्यात आले आहे प्रदर्शनात सकाळपासून रात्री उशिरापर्यंत शेतकरी नागरीक गर्दी करीत असून शालेय,महाविद्यालयीन विद्यार्थी - विद्यार्थीनींची गर्दी वाढलेली आहे.
प्रदर्शनात कृषी,औद्योगिक, वाहने,गृहोपयोगी साहीत्य यासह वर्षभरात ३०० अंडी देणाऱ्या कोंबडीसह पशु,पक्षी आज आकर्षण ठरले ब्लॅक अस्ट्रोलियन कोंबडीसह विविध जातीचे पक्षी,परदेशी भाजीपाला व फळे, कृषिविषयक, शासनाच्या कृषी विभागासह शासकीय योजना,वारणा दूध संघाची पशूखाद्ये, दुग्धजन्य पदार्थ, वारणा विद्यापीठातील शिक्षण संकुलाची शैक्षणिक माहीती स्टॉल,वारणा बझारचे
धान्य महोत्सव,कृषी औजारे,वाहने,कपडे, खाद्यपदार्थ, आरोग्य विषयक, डोळे,डोकेदुखी औषधे, चारचाकी वाहने यासह अनेक नाविण्यपूर्ण योजनांची माहीती दिली जात आहे.कृषी साधणे, बी बियाणे,स्टाॅलना मोठा प्रतिसाद मिळत आहे.