For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मधमाशांच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

10:46 AM Nov 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
मधमाशांच्या हल्ल्यात शेतकरी जखमी
Advertisement

हलगा येथे शेतकाम करताना मधमाशांचा अचानक हल्ला

Advertisement

बेळगाव : मधमाशानी अचानक हल्ला चढवून लोकांना दंश करण्याच्या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. बुधवारी हलगा येथे शेतीची कामे करण्यासाठी शेतात गेलेल्या शेतकऱ्यांवर मधमाशांनी अचानक हल्ला केला. या प्रकारामुळे शेतकरी भयभीत झाले आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, हलगा गावातील शेतकरी सकाळी 8.30 च्या सुमारास चारा आणण्यासाठी शेतात गेले होते. त्याचवेळी काही शेतकरी मळणीच्या कामातही गर्क होते. मात्र एका घारीने मधमाशांच्या पोळ्यावर झडप घातली व त्यामुळे मधमाशा चवताळल्या अन् त्यांनी शेतकऱ्यावर हल्ला चढविला.

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल

Advertisement

या हल्ल्यामुळे भयभीत झालेल्या शेतकऱ्यांनी जेथे मिळेल तेथे निवारा शोधला. परंतु त्यापैकी दोन शेतकरी मधमाशांच्या थव्यांच्या कचाट्यात सापडले. मधमाशांच्या हल्ल्यामुळे शेतकरी जखमी झाले असून, त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. दरम्यान गेल्या काही दिवसात मधमाशांनी हल्ले करण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. काही दिवसापूर्वी येळ्ळूर येथील सहा महिलांवर मधमाशांनी असाच हल्ला चढविला  होता.

शेतकऱ्यांनी दक्षता घेण्याची गरज

शेतकऱ्यांनी शेतात काम करताना किंवा जेथे मधमाशांचे पोळे आहे अशा ठिकाणी काम करताना काळजी घेणे आवश्यक आहे. मधमाशा कधी हल्ला करतील याचा नेम नसतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात काम करताना जवळपास एखादे कांबळं (घोंगडे) ठेवावे हे शक्य नसल्यास वाळले गवत घेऊन त्याला विस्तव लावून धूर करावा, धुरामुळे मधमाशा दूर जातात. जर मधमाशांनी चावा घेतला असेल तर शक्यतो थंड पाणी ओतून घ्यावे, मात्र त्वरित हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावेत. डॉक्टरांसाठी संपर्क साधण्यास टाळाटाळ करणे हे जीवावर बेतू शकते.

- डॉ. सुरेश रायकर

Advertisement
Tags :

.