For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

शेतकऱ्याच्या घरास आग लागून लाखोंचे नुकसान; कोगे येथे घटनेने लाखोंचे नुकसान

10:34 AM Mar 11, 2024 IST | Abhijeet Khandekar
शेतकऱ्याच्या घरास आग लागून लाखोंचे नुकसान  कोगे येथे घटनेने लाखोंचे नुकसान
Koge loss of lakhs

करवीर तालुक्यातील कोगे येथील युवराज दगडू मांगोरे, नवनाच दगडू मांगोरे व दत्तात्रय महादेव मांगोरे या तीन शेतकऱ्यांच्या राहत्या घराला रविवारी आग लागून मोठे नुकसान झाले.या आगीत घरातील सर्व साहित्य, शेती अवजारे, धान्य, कपडे, व महत्वाचे कागदपत्रे जळून खाक झाले. या आगीतून मांगोरे कुंटूंबियांचे लाखोचे नुकसान झाले आहे.

Advertisement

आग रात्री लागल्यामुळे बचाव कार्यास मोठा अडथळा झाला होता , आग भिषण असल्यामुळे आलू बाजूच्या लोकांना आग आटोक्यात आणणे सुखातीला अवघड झाले स्थानिक लोकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.

युवराज मांगोरे , नवनाथ मांगोरे, दत्तात्रय मांगोरे हे शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. जनावरांना लागणारा चारा व शेती अवजारे अशा विविध साहित्यांच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याचबरोबर घरातील असणारी मह्त्वाची कागदपत्रे, जळून खाक झाली आहे. आग लागण्याची माहिती पोलिस पाटील दतात्रय मिठारी यांनी प्रशासनास दिली., त्याचबरोबर अग्निशामक दल, व पोलिसांना वर्दी दिली. कोगे गावचे सरपंच, उपसरपंच, कोतवाल घटनास्थळी धाव घेऊन सहकार्य केले.

Advertisement

अग्निशामक दलाचे स्टेशन अधिकारी बांदेकर साहेब, ड्रायव्हर अमोल शिदे, फायरमन विशांत चव्हाण, रोहन लकडे आदी वर्दी मिळताच तात्काळ दाखल झाल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी मोलाचे सहकार्य लाभले. सदर घटनेची नोंद करवीर पोलिस स्टेशनला नोंद झाल्याने करवीर पोलीस कॉन्स्टेबल अनिल आगळे , रेक्यू फोर्स रोहित मिठारी यांनी झालेली गर्दी आटोक्यात आणली. आग नेमकी कशामुळे लागली ? कारण समजू शकले नाही. सदर घटनेने मांगोरे कुंटूबियाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी झाली आहे. पण सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

Advertisement

Advertisement
Tags :
×

.