कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पाटण तालुक्यात शेतकरी बेवारस

01:11 PM Aug 06, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

विहे :

Advertisement

उरल (ता. पाटण) येथील शेतकऱ्यांच्या शेतात विजेच्या चालू तारा तुटून लोंबकळत असल्याची तक्रार करूनही बीज वितरण मंडळ दखल घेत नाही. विजेचा धक्का लागण्याची बाट बीज कंपनी बघत आहे का? असा सवाला येथील शेतकऱ्याकडून होत आहे. बीज नसल्याने शेतकऱ्याचे टोमॅटो व जुकेणी पिकाचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. बीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा फटका अनेक शेतकऱ्यांना बसत आहे.

Advertisement

शेतात वीजवाहक तारा लॉचकळणे, प्रसंगी शेतातून गेलेल्या बीजवाहक तारा तुटुन पडणे त्याची देखभाल न करणे, झाडातून वीजवाहक तारा अडकणे, पोल वाकलेल्या स्थितीत असणे, वारंवार बारा पाऊस आला की बीजप्रवाह सतत खंडित होणे, अशा एक ना अनेक कारणामुळे बीज वितरण कंपनीचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.

नुकतीच अशीच एक घटना पाटण तालुक्यातील कोयना विभागातील मेढघर येथे घडली. शेतात तुटलेल्या बीजवाहक तारामुळे येथील एका शेतकऱ्याचा विजेचा धक्का लागून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना उरुल येथील पिराची पट्टी नावाच्या शिवारात गेल्या दहा दिवसापासून बीजवाहक तारा तुटलेल्या स्थितीत तशाच पडून आहेत. येथील शेतकऱ्यांनी कळवून तसेच उंब्रज बीज वितरण अधिकारी याना कळवूनही त्याची दखल घेतली जात नाही. मग एखादा अपघात घडल्यावरच बीज बाहक वाहिन्याची दुरूस्ती केली जाणार का? असा संतप्त सवाल शेतकरी वर्गातून विचारला जात आहे.

सध्या ३ ते ७ अश्वशक्ती पंपाना बीजबिल शासनाकडून माफ केले असल्याने शेती पंपाना वीजवाहक तारा तुटुन शेतात पडल्या आहेत. बीजप्रवाह करणाऱ्या वाहिन्याच्या दुरुस्तीकडे वीज वितरण कंपनी दुर्लक्ष करत असल्याचे बोलले जात आहे. घरगुती बीज पुरवत्यावरही जेवढी कार्यतत्परता बीज वितरण विभाग बीज देयके भरण्यासाठी शेतकयांचा उंबरा झिजवताना दिसतात मग दुरस्तीकडे पण तेवढी तत्परता का दाखवत नाहीत, हा सगळ्यानाच पडलेला प्रश्न आहे. कारण जरी काही अश्वशक्ती शेती पंपाना बीज माफ असली तरी त्याचा भार शासन सहन करत आहे. यात बीज वितरण कंपनीचे अजिबात नुकसान होत नसताना शेती पंपाच्या बीज वाहिन्याची दुरुस्ती करतानाही अधिकारी व कर्मचारी चालढकल करत असल्याच्याही तक्रारी वाढत आहे.

याबाबत संबधित विभागाने या बाहिन्याची तातडीने दुरुस्ती करावी अन्यथा बीज वितरण कार्यालयाला घेराव घालून झालेल्या नुकसानी विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा शेतकयांनी दिला आहे. याबाबत उंब्रज बीज वितरण विभागाच्या अधिकारी जाधव यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

आमच्या शेतात शेतीपंपाच्या विद्युत तारा तुटून आठ दिवस झाले आहेत. शेतात काम करण्यास अडथळा येत असून जीवाला बोका आहे. बार ते पाष वेळा फोनवरुन व एकदा प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना सांगून सुद्धा दखल घेतली नाही. दिरंगाईमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. बीजप्रवाह खंडित असल्याने फवारणी करता आली नाही, ड्रिपद्वारे खरो सोडता आली नाहीत. त्यामुळे नुकसानीची भरपाई कंपनीने द्यावी.

                                                                                                                                 -अक्षय निकम, शेतकरी

 

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article