Sangli : शिराळा तालुक्यात विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू
04:08 PM Jan 11, 2026 IST | NEETA POTDAR
Advertisement
विद्युत सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर;
Advertisement
शिराळा : शिराळा (ता. शिराळा) येथील राहणारे पांडुरंग रंगराव शिंदे (४६) यांचा शेतातील झाडांच्या फांद्या तोडत असताना इलेक्ट्रिक शॉक बसून मृत्यू झाला. सदर घटना शनिवारी १० रोजी सकाळी अकराच्या सुमारास घडली.
मोरणानगर रोड शिराळा येथील पांडुरंग शिंदे हे बिऊर शांतीनगर (ता. शिराळा) येथे बसंतराव जयसिंग पाटील यांच्या शेतातील बांधावरील झाडाच्या फांद्या तोडत असताना पांडूरंग शिंदेयांना झाडावरून जाणाऱ्या बीजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. ते झाडाला लोंबकाळताना मिळून आले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.
Advertisement
Advertisement