For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli News : शेतकऱ्याचा वीज शॉकने मृत्यू, कंत्राटी कर्मचारी व अभियंत्यावर गुन्हा

06:35 PM Feb 03, 2026 IST | NEETA POTDAR
sangli news   शेतकऱ्याचा वीज शॉकने मृत्यू  कंत्राटी कर्मचारी व अभियंत्यावर गुन्हा
Advertisement

                             कंठी येथे ब्री फेज कनेक्शनमुळे शेतकऱ्याचा मृत्यू

Advertisement

जत : जत तालुक्यातील कंठी येथे शेतात पहलेल्या ब्री फेज कनेक्शनच्या विद्युत वाहक तारेला स्पर्श होवून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्या प्रकरणी जत येथील वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यासह, कंत्राटी कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेत बिरमल शिवाजी काळे (वय ५०) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सांयकाळी घडली.याप्रकरणी जत पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

अधिक माहिती अशी, तालुक्यातील कंठी येथील शेतकरी बिरमत काळे हे रविवारी सायंकाळी शेतकामासाठी आपल्या शेतात गेले होते. परंतु या शेतातून गेलेल्या ब्री फेज कनेक्शनची वापर तुडून ती खाली पडली होती. त्यातून विद्युत प्रवाह सुरूच होता. या तारेचा स्पर्श काळे यांना होऊन शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला. वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्याला जीव गममावा लागला. त्यानंतर नातेवाईक, सेतकरी यांनी वीज वितरण कंपनीच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला. याप्रकरणी वीज वितरण कंपनीकडे तक्रार केली होती. जठवालानंतर कामात हयगय केल्याप्रकरणी कंपनीचे कुंभारी विभागाचे कनिष्ठ अभियंता सतीष माणिक रिवि व वाटी तंत्रज्ञ विशाल विठठल सुर्वे यांच्यावर जत पोलीस वाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.