For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Miraj News | विजेच्या पेटीला हात लावला अन् होत्याचं नव्हतं झालं! सलगरेतील 'त्या' मळाभागात नेमकं काय घडलं?

11:46 AM May 14, 2026 IST | NEETA POTDAR
miraj news   विजेच्या पेटीला हात लावला अन् होत्याचं नव्हतं झालं  सलगरेतील  त्या  मळाभागात नेमकं काय घडलं
Advertisement

                             मोटर सुरू करताना घडली दुर्दैवी घटना

Advertisement

मिरज : तालुक्यातील सलगरे येथेशेतीला पाणी सोडण्यासाठी मोटर सुरू करताना अचानक बीजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घडली. जगन्नाथ रामु खिचडे (वय ६५) असे मयत शेतकऱ्याचे नांव आहे. त्यांच्यासोबत असलेली सात वर्षाची मुलगी बचावली.

याबाबत अधिक माहिती अशी, सलगरेतील खिवडे बस्ती मळाभागात जगन्नाथ खिचडे हे राहण्यास होते. रविवारी सायंकाळी पिकांना पाणी सोडण्यासाठी ते शेतातील विहिरीजवळ गेले. दुपारी पाऊस पडल्यामुळे वीजेच्या पेटीवर पाणी
साचले होते. यातीलच एक विद्युत प्रवाहीत तार ओल्या जागेत पडली होती. मात्र जगन्नाथ यांना याची कल्पना नव्हती. ते सात वर्षाच्या नातीला घेऊन शेताकडे गेले होते. पाठीमागून नात चालत येत होती.

Advertisement

जगन्नाथ खिचडे यांनी विद्युत पेटीला हात लावताच त्यांना बीजेचा जोरात झटका बसला. ते जागेवरच तडफडत होते. सदरचा प्रकार पाहिल्यानंतर पाठीमागून आलेली नात घरी पळत गेली. सदरचा प्रकार पालकांना सांगितला. जगन्नाथ यांचे नातेईबाक शेताकडे येईपर्यंत उच्च दाबाच्या विद्युत प्रवाहाचा धक्काा बसून खिचडे यांचा मृत्यू झाला होता.

Advertisement
Tags :

.