कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Sangli : ऊसतोड मजूर देतो असे सांगून शेतकऱ्याची साडे अकरा लाखांची फसवणूक

12:58 PM May 05, 2025 IST | Snehal Patil
Advertisement

समडोळी येथील शेतकऱ्याला गंडा, सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद

Advertisement

सांगली : ऊसतोडणीसाठी मजूर पुरविण्याचे आश्वासन देऊन मिरज तालुक्यातील समडोळी येथील शेतकऱ्याची 11 लाख 70 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. याबाबत कुशाबा रामचंद्र मस्कर (रा. शिवाजी चौक, मस्कर गल्ली, समडोळी, ता. मिरज) यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मुकादम हरिश उर्फे हरिश्चंद्र बाजीराव जाधव (रा. नाडगाव, पो. सांडस, माजलगाव, जि. बीड) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement

याबाबत अधिक माहिती अशी, कुशाबा मस्कर यांच्या शेतातील उसाची तोडणी करण्यासाठी मजुरांची आवश्यकता होती. याची माहिती संशयित मुकादम हरिश जाधवला मिळाली. त्याने कुशाबा यांच्याशी संपर्क साधून 13 जोडी ऊसतोड मजूर पुरविण्याचे आश्वासन दिले. याकरिता त्यांच्याकडून 11 लाख 70 हजार रुपये बँकेच्या माध्यमातून घेतले. हा प्रकार 31 ऑगस्ट 2020 ते 30 जून 2024 या कालावधीत घडला. त्यानंतर वारंवार मागणी करुनही हरिशने मजूर पुरविले नाहीत. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली.

Advertisement
Tags :
_police_action@sanglinews#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediasugarcane
Next Article