महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शेतातील बिबटे आता शहरापर्यंत...भटक्या कुत्र्यांमुळे बिबट्यांचा मोर्चा शहराकडे

10:03 AM Sep 04, 2024 IST | Abhijeet Khandekar
leopard
Advertisement

वनविभागाने मानवी वस्तीमधील बिबट्यांचा बंदोबस्त करावा..

Advertisement

प्रितम निकम, शिराळा

शिराळा तालुक्यात शेतातील बिबटे आता शहरापर्यंत पोहचले. भक्ष्याच्या शोधात दोन दिवसांपासून शहरातील मानवी वस्तीत बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे‌. चार वर्षात शेकडो जनावरे व हजारो कुत्री बिबट्याच्या हल्यात दगावली आहेत. तर एका लहान मुलाचा मृत्यू झालायं. आणि एका मुलाला बिबट्याच्या हल्यातून वाचवण्यात यश आले आहे. शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे बिबट्यांचा मोर्चा शहराकडे वळल्याची चर्चा सुरू आहे. तर वनविभागाने मानवी वस्तीमधील बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.

Advertisement

दोन दिवसांपूर्वी शिराळा येथील कोकरूड रस्त्यावरील पेट्रोल पंप, सुगंधा नगर मधून एसटी कॉलनी तसेच भुईकोट पर्यंत बिबट्याचे दर्शन झाले असून पायाचे ठसे ही पहावयास मिळत आहेत. तर गोरक्षनाथ मंदिर बाह्य वळण रस्त्यावर तसेच कोकरुड रोड जुना विसावा धाबा येथे सीसीटीव्हीमध्ये बिबट्या दिसल्याने नागरिकांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.

रविवार दिनांक १ रोजी रात्री साडेदहाच्या दरम्यान कोकरुड रोड, सुगंधा नगर मधून एसटी कॉलनी ,मोरणा कॉलनी मधून हॉटेल विसावा इथून बिबट्या कदमवाडी वस्तीकडे जाताना दिसला. सदर बिबट्या हा या परिसरात फिरताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. याचबरोबर सोमवारी दुपारी दीड च्या दरम्यान श्री गोरक्षनाथ मंदिर जवळील मारुती मंदिर बाह्य वळण रस्त्यावर बिबट्या दिसला.याबाबत माहिती मिळताच वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली हणमंत पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली. तर याच दिवशी पाडळेवाडी येथील वैभव आदीक नाईकवाडी यांच्या शेतातील वस्तीवरील बोकडाला बिबट्याने हल्ला करून ठार मारले.
तर मंगळवारी रात्री शिराळा शहरातील घुमट स्मशानभूमी येथील लोकवस्ती मध्ये अतुल नलवडे यांच्या घराजवळ बिबट्या दिसला. याचा व्हिडिओ शहरात वार्यासारखा पसरल्याने लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सध्या शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शहरातील चौकाचौकात भटक्या कुत्र्यांचे कळप असून हे बिबट्यांचे मुख्य भक्षच असल्याने बिबट्यांनी आपला मोर्चा शहराकडे वळवला आहे.

Advertisement
Tags :
Farm leopardsthe city Leopardsto stray dogs
Next Article