महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नंदगड-भागात गणरायांना निरोप

10:38 AM Sep 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वार्ताहर/नंदगड

Advertisement

नंदगड गावच्या सार्वजनिक गणपतींचे विसर्जन मंगळवारी रात्री 10 वाजता कमल तलावात झाले. मंगळवारी रात्री 8 वाजता बाजारपेठमधून मिरवणुकीला वाजतगाजत सुरुवात झाली. यावेळी फटाक्याची आतषबाजी करण्यात येत होती. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, असा जयघोष होत होता. मिरवणूक कमल तलावात येताच वाहनातील मूर्ती क्रेनच्या साहाय्याने तलावात विसर्जित करण्यात आली.

Advertisement

झाडनावगा

झाडनावगा येथील सार्वजनिक गणपतीचे विसर्जन गावच्या उत्तरेला असलेल्या नाल्यात करण्यात आले. त्यापूर्वी गणेशमूर्ती ट्रॅक्टरमध्ये ठेवून विसर्जनासाठी नेण्यात आली. या मिरवणुकीत ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

झुंजवाड के. एन.

झुंजवाड के. एन. गावातील गणेशमूर्ती ट्रॅक्टरमध्ये ठेवून मंगळवारी सायंकाळी सार्वजनिक गणेशमूर्तीची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. तलावात मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. यावर्षी विसर्जन मिरवणुकीला महिलांची मोठी उपस्थिती लाभली.

कसबा नंदगड

कसबा नंदगड येथील सार्वजनिक गणपती मूर्तीची ट्रॅक्टरमधून मिरवणूक काढण्यात आली. रात्री येथील व्हन्नव्वादेवी तलावात गणेशमूर्ती विसर्जित करण्यात आली. या मिरवणुकीत युवकांचा मोठा सहभाग दिसून येत होता.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article